IPL Auction 2026 : कॅमेरुन ग्रीन सर्वात महागडा विदेशी खेळाडू, किती कोटींची बोली लागली?
IPL Auction 2026 : लिलावानंतर प्रतिक्रिया देताना कॅमरून ग्रीन म्हणाला, “कोलकाता संघाकडून खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ईडन गार्डन्ससारख्या ऐतिहासिक मैदानावर खेळण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची बाब आहे.”
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कॅमेरुन ग्रीन सर्वात महागडा विदेशी खेळाडू, किती कोटींची बोली लागली?
कॅमरून ग्रीनने मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला
IPL Auction 2026 : आयपीएल 2026 च्या हंगामाआधी मंगळवारी पार पडलेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर मोठी बोली लागली असून कोलकाता संघाने तब्बल 25.20 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. यामुळे ग्रीन हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे.
कोलकाताने केवळ ग्रीनच नाही, तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना यालाही आपल्या ताफ्यात घेतले. पथिरानासाठी कोलकाताने 18 कोटी रुपये मोजले असून तो आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरला आहे.
अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवरही पैशांचा पाऊस
या लिलावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या ‘अनकॅप्ड’ भारतीय खेळाडूंनीही मोठी कमाई केली. उत्तर प्रदेशचा 20 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज प्रशांत वीर आणि राजस्थानचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज कार्तिक शर्मा यांना चेन्नई संघाने प्रत्येकी 14.20 कोटी रुपये देऊन संघात घेतले. विशेष म्हणजे, या दोघांची मूळ किंमत केवळ 30 लाख रुपये होती. त्यामुळे हे दोघे आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कम मिळवणारे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी दार याच्यासाठी दिल्ली संघाने 8.40 कोटी रुपये* मोजले. त्याचीही आधार किंमत 30 लाख रुपयेच होती.
हेही वाचा : सेक्स, दारू आणि... 'आजच्याच दिवशी' झालेल्या पराभवाचं 'हे' आहे खरं कारण, पाकिस्तानची 'अशी' लागलेली वाट!










