अजितदादांसोबत किती बैठका झाल्या? जयंत पाटलांचा मोठा खुलासा, मात्र 'त्या' एका प्रश्नाचं उत्तर टाळलं
Jayant Patil : शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 'मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजितदादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजितदादांसोबत किती बैठका झाल्या?
जयंत पाटलांचा मोठा खुलासा
Jayant Patil : शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 'मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजितदादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. बारामतीला जी सर्व नेत्यांची बैठक झाली त्यासाठी आधी आम्ही विमानाने जाणार होतो. पण बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरेल असे विमान मिळाले नाही.'
हे ही वाचा : "सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, याबाबत मला माहिती नव्हती", शपथविधीच्या आधी शरद पवारांनी केला खुलासा
'महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करु'
जयंत पाटील म्हणाले की, 'अजितदादांची अशी इच्छा होती की साहेबांच्या (शरद पवार) देखतच दोन्ही पक्ष एकत्रित करायचे आहेत. माझ्याबाबत जे जनमानसात आहे ते पुसून साहेबांच्या पक्षासोबत एकत्रित यायला तयार असल्याचं अजितदादा म्हणाले होते. जवळपास आठ-दहा वेळा त्यांच्यासोबत बैठका झाल्या. दोन-चार बैठका तर त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या. मागील दोन अडीच वर्षाचा कालखंड विसरुन महाराष्ट्रात राष्ट्रवादी एकत्रित करु अशी त्यांची आग्रही भूमिका होती'.
..म्हणून 12 फेब्रुवारी ही तारीख निवडली
जयंत पाटील म्हणाले की, '12 फेब्रुवारीला एकत्रीकरणा बद्दलची तारीख ठरली होती. दोन्ही पक्ष आधी एकत्रित करायचे मग नंतर बाकीचे निर्णय घ्यायचे असं अजितदादांच्या मनात होतं. या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे यांना आवर्जून घेतलं होतं. जिल्हा परिषदांच्या निवडणुका आघाडीत लढवू. या निवडणुकींच्या निकालानंतर प्रक्रियेसाठी चार-पाच दिवस लागतील. त्यामुळे 12 फेब्रुवारी ही तारीख निवडण्यात आली होती.'










