यंदाच्या गुढीपाडव्याला होणार लक्ष्मीची कृपा! हिंदू नववर्षापासून 'या' राशींच्या आयुष्यात भरभराट, तुमची रास यात आहे का?
Gudhipadwa 2026 : आज गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र महिन्याची सुरुवात ही आपल्या जीवनात नवी सुरुवात आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक मोठी संधी असते. या काळात देवी दुर्गेच्या कृपेसोबतच ग्रहांची स्थितीही अनेकांसाठी भाग्याची द्वारे उघडू शकते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
यंदाच्या गुढीपाडव्याला होणार लक्ष्मीची कृपा!
हिंदू नववर्षापासून 'या' राशींच्या संपत्तीत भरघोस वाढ
तुमची रास यात आहे का?
Gudhipadwa 2026 : आज गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र महिन्याची सुरुवात ही आपल्या जीवनात नवी सुरुवात आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक मोठी संधी असते. या काळात देवी दुर्गा आणि लक्ष्मीमातेच्या कृपेसोबतच ग्रहांची स्थितीही अनेकांसाठी भाग्याची द्वारे उघडू शकते. कारण सूर्य मीन राशीत असेल आणि गुरूची शुभ दृष्टी काही राशींसाठी उत्तम परिणाम घेऊन येईल. अशा परिस्थितीत अनेक जातकांना करिअर, धन आणि नात्यांमध्ये मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: क्रेडिट कार्ड हरवल्यावर झटपट करा ही 7 कामं, नाहीतर होईल प्रचंड नुकसान
'या' राशींच्या भाग्याचे द्वार उघडणार
मिथुन : मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये कौतुक आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होऊ शकतात. समाजात तुमची ओळख मजबूत होईल.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आता योग्य वेळ आली आहे. प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढेल, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. घरातील वातावरणही पूर्वीपेक्षा सुधारेल. कुटुंबाची साथ लाभेल.










