Pradnya Satav: भाजपचं नवं 'ऑपरेशन लोटस', एक राजीनामा आणि अनेक पक्षी गारद.. विधानपरिषदेत काँग्रेसचा खेला होबे!
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची विधानपरिषेद आता मोठी अडचण झाली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी तात्काळ भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसलू मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. दरम्यान, भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेसला विधानपरिषदेत मोठा धक्का बसला आहे.
या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे. एकीकडे पक्षाची महिला नेत्या आणि मराठवाड्यातील महत्त्वाचा चेहरा काँग्रेसने गमावला आहे, तर दुसरीकडे विधानपरिषदेतील संख्याबळ घटल्याने विरोधी पक्षनेते पदावर दावा देखील कमकुवत झाला आहे.
विधानपरिषदेतील संख्याबळ आणि नियम काय सांगतात?
महाराष्ट्र विधानपरिषदेत एकूण 78 जागा आहेत. विरोधी पक्षनेते पद ओळखण्यासाठी आणि त्याच्या सुविधा मिळवण्यासाठी संबंधित पक्षाकडे विधानपरिषदेतील किमान 10 टक्के सदस्यसंख्या (म्हणजे किमान 8 जागा) असणे आवश्यक असते. आतापर्यंत काँग्रेसकडे विधानपरिषदेत 8 आमदार होते, ज्यामुळे विरोधी पक्षातील सर्वाधिक जागा असलेल्या पक्ष म्हणून त्यांचा या पदावर दावा होता. पण प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ 7 वर आले आहे. यामुळे आता काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणे अशक्य झाले आहे.
हे ही वाचा>> "19 डिसेंबर रोजी काय होईल, ते कठीण.." पंतप्रधान पदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडे (शिवसेना UBT, राष्ट्रवादी शरद पवार गट) कमी जागा असल्याने हे पद रिक्त राहण्याची किंवा दुसऱ्या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.










