अमरावती: भररस्तात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या! घटनेनंतर, संतप्त टोळक्याची परिसरात दहशत...

मुंबई तक

अमरावतीत जुन्या वैमनस्यातून एका 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी (19 डिसेंबर) दुपारी जवळपास 3.30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

ADVERTISEMENT

19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या!
19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भररस्तात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या!

point

संतप्त टोळक्याची परिसरात दहशत...

point

अमरावतीतील धक्कादायक घटना

अमरावती: अमरावतीत जुन्या वैमनस्यातून एका 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी (19 डिसेंबर) दुपारी जवळपास 3.30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संबंधित घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील वाळकी डॅमजवळ एका रस्त्यावर घडली. मंथन रविंद्र पालणकर (19) अशी मृताची ओळख समोर आली आहे. 

चाकूने वार करत हत्या 

पोलिसांच्या माहितीनुसार, बाईकवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी रस्त्यावर मंथनला घेरलं आणि त्याच्या पोट, पाठीवर चाकूने वार केले. त्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मंथनचा जागीच मृत्यू झाला. 

हे ही वाचा: पुणे: एकतर्फी प्रेम, पण दुसऱ्या तरुणासोबत लग्न झाल्याने थेट पतीचा गेम! सासवडमधील धक्कादायक घटना!

आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

तरुणाच्या हत्येची बातमी पसरताच, 10 ते 15 जणांच्या टोळक्याने गोपालनगर, केडियानगर आणि शंकरनगर परिसरात दहशत माजवली. संतापलेल्या तरुणांनी 7 ते 8 गाड्यांची तसेच, कित्येक दुचाकी वाहनांची तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रसंगी राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत 10 लोकांना ताब्यात घेतलं. तसेच, संतोष घाते, सुजल शर्मा आणि सुजल जायभाये नांदगाव पेठ पोलिसांच्या अटकेत आहेत. 

हे ही वाचा: नवऱ्याने क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या, गरोदर पत्नीला बिअर पाजली अन् मित्रांना.. , घटनेने खळबळ

नेमकं काय घडलं? 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मंथन पालणकर हा 21 ऑगस्ट 2024 रोजी घडलेल्या यश रोडगे हत्याप्रकरणातील आरोपी असून याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंथन डॅमकडे जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर, वाळकी डॅमच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच आरोपींनी पीडित तरुणासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. दरम्यान, त्यांनी मंथनच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने बरेच वार केले आणि यामध्ये पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp