छत्रपती संभाजीनगर : मूकबधीर सासऱ्याची निर्घृण हत्या करून मृतदेह गोदावरीत फेकला, कैद्याला फोटो दाखवताच गूढ उकलले
Chhatrapati Sambhajinagar Crime : पैठण तालुक्यातील पाटेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात चार दिवसांपूर्वी एक संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. पोत्यात गुंडाळलेला हा मृतदेह दोरीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने हत्या झाल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगर : मूकबधीर सासऱ्याची निर्घृण हत्या करून मृतदेह गोदावरीत फेकला
कैद्याला फोटो दाखवताच गूढ उकलले
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडलेल्या एका थरारक हत्येचा छडा अखेर पोलिसांनी लावला आहे. मूकबधीर सासऱ्याची क्रूरपणे हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून गोदावरी नदीच्या पात्रात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कारागृहातील एका कैद्याला मृतदेहाचा फोटो दाखवताच या बेवारस मृतदेहाची ओळख पटली आणि संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.
पैठण तालुक्यातील पाटेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात चार दिवसांपूर्वी एक संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. पोत्यात गुंडाळलेला हा मृतदेह दोरीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने हत्या झाल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. मृतदेह बेवारस असल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक सक्रिय करण्यात आले.
तपासादरम्यान परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्यात आल्या. तसेच आजूबाजूच्या गावांत चौकशी सुरू होती. दोन दिवसांच्या मेहनतीनंतर हा मृतदेह गदेवाडी येथील कृष्णा पंढरीनाथ धनवडे (वय 38) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. कृष्णा हे मूकबधीर होते. ते अनेकदा घरातून निघून जात असत आणि दीर्घकाळाने परतत असत. मोबाईल फोन नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ताची तक्रारही दिली नव्हती.
हेही वाचा : कोल्हापूर : पोटच्या पोराने आई-वडिलांना क्रूरपणे संपवलं, हाताच्या नसा कापल्या, काठीने बेदम मारलं










