‘तुम्ही फक्त कमळावर मतदान करा’, रवींद्र चव्हाणांच्या विधानाने उंचावल्या सर्वांच्या भुवया!
Ravindra Chavan BJP: डोंबिवलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एक अत्यंत सूचक विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

डोंबिवली: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात भारतीय जनता पार्टीकडून भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याच मेळाव्याला संबोधित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एक अत्यंत मोठं आणि सर्वांच्या भुवया उंचावणारं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
रवींद्र चव्हाण भाषणादरम्यान म्हणाले की, ‘काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप डोंबिवलीकर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या शहीद नागरिकांचे अंतिम दर्शन याच मैदानात झाल्याने, ती आठवण कायम जिवंत ठेवण्याची गरज आहे.‘
मेळाव्यात देशावर झालेल्या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस उत्तर दिल्याचे सांगत ‘सिंदूर’ कारवाईद्वारे भारताच्या लष्करी पराक्रमाचे दर्शन संपूर्ण जगाला घडल्याचे नमूद करण्यात आले. काही काँग्रेस व विरोधी पक्षातील नेत्यांची देशविरोधी वक्तव्ये निषेधार्ह असल्याची टीका यावेळी करण्यात आली. राजकारणापेक्षा देशभक्ती आणि राष्ट्रहित मोठे असल्याचे जनतेला समजले पाहिजे, असे आवाहनही करण्यात आले.










