नगर परिषद निवडणूक: ‘आज’ निवडता येणार तुमचा नगरसेवक, 154 वॉर्डात मतदान.. पाहा संपूर्ण यादी!

मुंबई तक

महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील एकूण 154 सदस्य पदांसाठीची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली होती. ज्यासाठी आज (20 डिसेंबर) मतदान होणार आहे. पाहा कोणकोणत्या वॉर्डात मतदान होणार आहे.

ADVERTISEMENT

nagar parishad elections voting will be held in 154 wards 20 december 2025 see in which districts elections will take place
नगर परिषद निवडणूक
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबर रोजी अचानक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक मोठा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील एकूण 154 सदस्य पदांसाठी 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान 20 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय न्यायालयीन अपील आणि प्रभाग रचना विवादांमुळे घेण्यात आला होता, यामुळे तब्बल 154 वॉर्डातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ज्या आता आज (20 डिसेंबर) पार पडणार आहेत.

उद्या होणार मतदान

मूळतः 2 डिसेंबरला होणाऱ्या 154 सदस्य पदांच्या निवडणुका आज (20 डिसेंबर) होणार असून, संपूर्ण नगर परिषदा आणि नगर पंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होईल.

पुढे ढकलण्यात आलेल्या वॉर्डातील इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत देण्यात आली होती. उर्वरित नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सदस्यांचा निवडणुका मात्र 2 डिसेंबरला पार पडल्या होत्या. ज्यात सदस्य आणि नगराध्यक्ष पदांसाठी मतदान झालं होतं. राज्यातील एकूण 3820 प्रभागांपैकी 154 वॉर्डांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ज्या उद्या होणा आहेत. 

'या' जिल्हातील नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील सदस्यांसाठी होणार मतदान

1. पुणे जिल्ह्यातील एकूण 10 जागांसाठी आज होणार मतदान

हे वाचलं का?

    follow whatsapp