बारामतीसह 'या' नगर परिषदांसाठी उद्या मतदान, पाहा तुमची नगरपालिका आहे का 'या' यादीत?

रोहित गोळे

Nagar Parishad Elections: महाराष्ट्रातील 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींसाठी उद्या (20 डिसेंबर) रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी 288 नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे निकाल जाहीर केले जातील.

ADVERTISEMENT

voting will be held in 20 nagar parishads and 4 nagar panchayats on 20 december 2025 is your municipality on this list
नगर परिषद, नगर पंचायतींसाठी मतदान
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीसाठी उद्या (20 डिसेंबर) मतदान घेण्यात येणार आहे. सुरवातीला एकूण 288 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी घेण्याचं निश्चित झालं होतं. पण त्यापैकी 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका या अचानक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रभाग रचनेवरील अनेक अपील कोर्टात प्रलंबित असल्याने या 20 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ज्या आता उद्या पार पडणार आहे. या निवडणुका पार पडल्यानंतर एकूण 288 नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल हा 21 डिसेंबरला जाहीर होईल.

नेमक्या कोणत्या कारणामुळे निवडणुका पुढे ढकलेल्या?

काही नगर परिषदांमध्ये प्रभाग रचनेवरून (ward delimitation) अनेक अपील कोर्टात प्रलंबित होते. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याने, आयोगाने या प्रलंबित प्रकरणांचा विचार करून निर्णय घेतला. विशेषतः ज्या ठिकाणी प्रभागांचे वाटप किंवा आरक्षणाबाबत वाद होत्या, त्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. ज्यासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येईल असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं.

या 20 नगर परिषदांसाठी होणार उद्या मतदान

क्र. जिल्हा नगर परिषद
1 पुणे बारामती
2 पुणे फुरसुंगी-उरळी देवाची
3 अहिल्यानगर कोपरगाव
4 अहिल्यानगर देवळाली-प्रवरा
5 अहिल्यानगर पाथर्डी
6 सातारा महाबळेश्वर
7 सातारा फलटण
8 सोलापूर मंगळवेढा
9 यवतमाळ यवतमाळ
10 अमरावती अंजनगाव-सूर्जी
11 वाशिम वाशिम
12 चंद्रपूर घुग्घुस
13 बुलढाणा देऊळगाव राजा
14 वर्धा वर्धा
15 अकोला बाळापूर
16 हिंगोली बसमतनगर
17 नांदेड मुखेड
18 नांदेड धर्माबाद
19 लातूर निलंगा
20 ठाणे अंबरनाथ

 

या 4 नगर पंचयतींसाठी होणार उद्या मतदान

 

हे वाचलं का?

    follow whatsapp