कोल्हापूर : पोटच्या पोराने आई-वडिलांना क्रूरपणे संपवलं, हाताच्या नसा कापल्या, काठीने बेदम मारलं
Kolhapur Crime : भोसले दाम्पत्याला तीन मुले होती. मोठे दोन मुलगे चंद्रकांत आणि संजय हे आपल्या कुटुंबासह गावाबाहेर राहत होते, तर धाकटा मुलगा सुनील आई-वडिलांसोबत राहात होता. सुनीलचे वर्तन संशयी आणि विचित्र असल्याचे सांगितले जाते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्हापूर : मुलाने आईला हाताची नस कापून तर वडिलांनी काठीने मारुन संपवलं
चेहऱ्यावर पश्चातापाची भावनाही नाही
Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये शुक्रवारी (दि.19) पहाटे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची अत्यंत निर्दयपणे हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना हुपरी येथील महावीरनगर कॉलनीत आज सकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय सुनील नारायण भोसले याचा घराच्या वाटपावरून आपल्या वृद्ध आई-वडिलांशी वारंवार वाद होत होता. याच वादाचा भडका उडत आज पहाटे सुनीलने आपले वडील नारायण गणपतराव भोसले (वय 78) आणि आई विजयमाला नारायण भोसले (७०) यांच्यावर हल्ला केला. प्रथम त्याने दोघांच्याही हातांच्या नसांवर वार केला. त्यानंतर दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. या अमानुष हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सुनील भोसले स्वतः हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यात येताना किंवा चौकशीदरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही पश्चात्तापाची भावना दिसून आली नाही. यामुळे उपस्थित पोलीस आणि नागरिकांमध्येही संताप व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा : Personal Finance: 25 हजार पगार असणारेही होतील धनवान, ’असे’ मिळतील 10 लाख रुपये










