नवऱ्याने क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या, गरोदर पत्नीला बिअर पाजली अन् मित्रांना.. , घटनेने खळबळ

मुंबई तक

Crime News : करीमुद्दीनपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या या महिलेचं लग्न सुमारे तीन वर्षांपूर्वी झालं होतं. सुरुवातीचे अडीच वर्ष संसारात विशेष वाद नव्हते. मात्र, गेल्या एका महिन्यात पतीच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि त्यानंतर तिचं आयुष्यच अस्थिर झालं, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या

point

गरोदर पत्नीला बिअर पाजली अन् मित्रांना.. , घटनेने खळबळ

Crime News  : पती-पत्नीच्या नात्यावर विश्वास, सन्मान आणि सुरक्षिततेची अपेक्षा असते. मात्र उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून, एका विवाहित महिलेने स्वतःच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नवऱ्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मित्रांमध्ये पसरवलेच नाहीत, तर तिला जबरदस्ती दारू पाजून “तुला विकून टाकीन” अशी धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

करीमुद्दीनपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या या महिलेचं लग्न सुमारे तीन वर्षांपूर्वी झालं होतं. सुरुवातीचे अडीच वर्ष संसारात विशेष वाद नव्हते. मात्र, गेल्या एका महिन्यात पतीच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि त्यानंतर तिचं आयुष्यच अस्थिर झालं, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

महिलेच्या आरोपानुसार, पतीने तिचे खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो काढून ते आपल्या मित्रांना पाठवले. एवढ्यावरच न थांबता, तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला. याची माहिती मिळताच तिने पतीला जाब विचारला. मात्र, उत्तर देण्याऐवजी पतीने तिच्यावर हात उचलला आणि मारहाण केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे.

तक्रारीनुसार, यानंतर पतीने तिला जबरदस्ती दारू पाजली. दारूच्या नशेत असताना तिला पतीचं संभाषण ऐकू आलं, ज्यात तो कोणाला तरी सांगत होता की, “तिला विकून टाकणार आहे, म्हणूनच हा व्हिडिओ तयार केला आहे.” हे ऐकून ती पूर्णपणे हादरून गेली.

हे वाचलं का?

    follow whatsapp