विवाहित महिलेचं नको तसलंच काम, 27 वर्षीय तरुणाला फसवलं अन्... अश्लील व्हिडिओ बनवून केलं ब्लॅकमेल

मुंबई तक

crime news : सोशल मीडियावरील मेसेज पाठवणं ही एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक बनू शकते, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीने आपल्या चेहऱ्याला फेस मार्क लावून नग्न व्हिडिओ दाखवण्याच्या बहाण्याने एक्स ट्विटरवर रिक्वेस्ट पाठवली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ती नग्न व्हिडिओ शेअर करत होती आणि...

point

तिनं ब्लॅकमेल करत भरतवर लग्नाचा दबाव आणला 

point

40 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर

Crime News : सोशल मीडियावरील मेसेज पाठवणं ही एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक बनू शकते, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीने आपल्या चेहऱ्याला फेस मार्क लावून नग्न व्हिडिओ दाखवण्याच्या बहाण्याने एक्स ट्विटटरवर रिक्वेस्ट पाठवली. नंतर हे प्रकरण धमक्या, दबाव आणि लाखो रुपयांच्या खंडणीपर्यंत जाऊन पोहोचले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, तरुणाला जबरदस्तीने लग्न करण्यास देखील भाग पाडण्यात आले. परंतु लग्नाच्या निमित्ताचा चांगला वापर करून त्याची फसवणूक करण्यात आली. ट्विटवर भेटलेल्या एका तरुणीने त्याला पहिल्यांदा ब्लॅकमेल करण्यात आले, नंतर लग्नासाठी जबरदस्ती केली आणि नंतर रोख रक्कम आणि दागिने देखील तो घेऊन पळाला. पीडिता आता न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

हे ही वाचा : पोलीस ठाण्यात महिला वकिलाला विवस्त्र करून लैंगिक छळ, नंतर जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

ती नग्न व्हिडिओ शेअर करत होती आणि...

या प्रकरणातील पीडिताचं नाव हे भरत कुमार (वय 27) वर्षे असे आहे. दरम्यान, भरत हा आंध्र प्रदेश जिल्ह्यातील चेरालोपल्ली येथील रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. भरतच्या म्हणण्यांनुसार, 2019 मध्ये त्याच्या एक्स अकाउंटवर तरुणीने मेसेज केला होता. पैसे कमावण्याचा तो एक मार्ग असल्याचं महिलेनं म्हटलं होतं. ती नग्न व्हिडिओ शेअर करत होती आणि एक हजार रुपयांसाठी दहा मिनिटे ऑनलाइन नग्न पोज देखील द्यायची.

अनेकजण या प्रकरणात बळी ठरले आणि नंतर त्याने टेलिग्रामद्वारे चेहरा झाकण्यात आलेल्या महिलेचा नग्न व्हिडिओ पाहू लागला होता. नंतर येथूनच ब्लॅकमेलिंगची सुरुवात करण्यात आली. महिलेनं व्हिडिओंचे स्क्रीनशॉट घेतले आणि भरतला धमकावू लागली आणि हळूहळू त्याच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. 

तिनं ब्लॅकमेल करत भरतवर लग्नाचा दबाव आणला 

तिनं ब्लॅकमेल करत, भरतवर लग्न करण्यास दबाव आणला होता. नंतर 2021 मध्ये दोघे लखनऊ आणि गोरखपूरमध्ये भेटले होते, नंतर तिथे त्यांनी दोन दिवस एकत्र घालवण्यास सुरुवात केली. नंतर 2023 मध्ये, महिलेनं हैदराबादला प्रवास केला आणि भरतला तिच्याशी लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती. नंतर दबाव आणि भीतीमुळे, भरतने मार्च 2025 एका मंदिरात तिच्याशी लग्न केले आणि नंतर कोर्ट मॅरेज देखील करण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp