सोशल मीडियावर ओळख अन् आभासी प्रेम, भेटण्यासाठी आणाभाका, सोलापुरातल्या बार्शीची मुलगी थेट डेहराडूनला गेली

मुंबई तक

Barshi News : मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच पालकांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी तात्काळ बार्शी पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोलिसांनी विलंब न करता तपास सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने तिच्या मोबाईलचा तांत्रिक मागोवा घेण्यात आला. तपासादरम्यान मुलीचे लोकेशन थेट डेहराडूनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले.

ADVERTISEMENT

Barshi News
Barshi News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावर ओळख अन् आभासी प्रेम, भेटण्यासाठी आणाभाका,

point

सोलापुरातल्या बार्शीची मुलगी थेट डेहराडूनला गेली

बार्शी (सोलापूर) : मोबाईल, सोशल मीडिया आणि अखंड इंटरनेटमुळे जग जवळ आल्यासारखे वाटते. मात्र, या आभासी विश्वात भावनांच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे जिवंत उदाहरण बार्शी तालुक्यातून समोर आले आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याच भावनिक ओढीतून बार्शीतील एका अल्पवयीन मुलीने थेट 1700 किलोमीटर दूर असलेल्या उत्तराखंडमधील डेहराडूनकडे धाव घेतली. सुदैवाने, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा धोकादायक प्रवास अनर्थ ठरण्याआधीच थांबवण्यात आला.

किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याच दरम्यान बार्शीतील या अल्पवयीन मुलीची एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डेहराडूनमधील एका अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. सुरुवातीला साधी गप्पा आणि संदेशांपुरती मर्यादित असलेली ही ओळख हळूहळू फोन कॉल्सपर्यंत पोहोचली. दिवसेंदिवस संवाद वाढत गेला आणि दोघेही भावनिक नात्यात अडकत गेले. प्रत्यक्ष भेट न झालेली असतानाही स्क्रीनवर दिसणारे शब्द आणि भावना त्यांना खरी वाटू लागली.

हेही वाचा : एका माणसाचे 268 मुलं? पनवेल महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ? उच्च न्यायालयात याचिका दाखल

दोघांमधील अंतर हजारो किलोमीटरचे असतानाही प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी संबंधित मुलगा महाराष्ट्रात येणार होता; मात्र काही कारणांमुळे तो बेत फसला. त्यानंतर या मुलीनेच धाडसी, पण अत्यंत धोकादायक असा निर्णय घेतला. घरच्यांना कोणतीही कल्पना न देता, काही कपडे आणि थोडे पैसे घेऊन तिने घर सोडले. बार्शीतून ती प्रथम पुण्याला पोहोचली आणि तिथून रेल्वेने उत्तर भारताकडे प्रवास सुरू केला. सलग दोन दिवसांचा प्रवास करत तिने डेहराडूनपर्यंत मजल मारली. पूर्णपणे अपरिचित शहरात, केवळ सोशल मीडियावर ओळख असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून केलेला हा प्रवास तिच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरू शकला असता.

हे वाचलं का?

    follow whatsapp