विधवा महिलेसोबत प्रेमसंबंध पण तिच्याच 13 वर्षीय मुलीवर वाईट नजर! अखेर, पीडितेने 'असा' केला शेवट...
एका महिलेने त्याच्या प्रियकराची हत्या केल्याचं वृत्त आहे. संबंधित प्रियकराची आरोपी महिलेच्या 13 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर असल्याकारणाने तिने त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधवा महिलेसोबत प्रेमसंबंध...
पण तिच्याच 13 वर्षीय मुलीवर वाईट नजर!
अखेर, पीडितेने 'असा' केला शेवट...
Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील चौबेपूर परिसरातील रौतापूर गावात एका महिलेने त्याच्या प्रियकराची हत्या केल्याचं वृत्त आहे. संबंधित प्रियकराची आरोपी महिलेच्या 13 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर असल्याकारणाने तिने त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
प्रियकराची 13 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर...
खरं तर, सपनाच्या (बदललेलं नाव) पतीचं निधन झालं असून ती 4 वर्षांपासून गोरेलाल नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंधात होती. महिलेचा प्रियकर सतत तिच्या घरी येत-जात असायचा. बऱ्याचदा, तो तिच्या घरात रात्र सुद्धा घालवायचा. त्या महिलेच्या मुलांना सुद्धा गोरेलाल आपल्या वडिलांची कमतरता पूर्ण करेल, असं वाटत होतं. मात्र, आरोपी प्रियकराच्या मनात वेगळंच होतं. सपनाच्या 13 वर्षांच्या मुलीवर आरोपीची वाईट नजर होती. त्यामुळे, तो सतत त्याच्या विधवा प्रेयसीवर मुलीसोबत संबंध ठेवण्यासाठी सतत दबाव आणत होता. इतकेच नव्हे तर, मुलीसोबत संबंध ठेवू न दिल्यास तिच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी सुद्धा त्याने दिली.
गळा दाबून हत्या अन् मृतदेह खड्ड्यात पुरला
अखेर, सपनाने तिचा भाचा यीशुसोबत मिळून प्रियकराचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. महिलेने तिच्या प्रियकराला लग्नाचं आमिष दाखवून माहेरी घेऊन गेली. तिथे तिने त्याला भरपूर दारू पाजली आणि गोरेलाल नशेत बेशुद्ध झाला. त्यावेळी, सपनाने त्याच्या भाच्यासोबत मिळून गोरेलालची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर, यीशुने त्याच्या मित्राला बोलवलं आणि तिघांनी मिळून गोरेलालचा मृतदेह 300 मी. जंगलात खड्डा खोदून त्यात पुरला.
आरोपी महिलेने काय सांगितलं?
2 नोव्हेंबर रोजी गोरेलालच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासादरम्यान, गोरेलालचे सपनासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. त्यानंतर, सपनाची चौकशी करण्यात आली आणि कठोर चौकशीदरम्यान तिने तिचा गुन्हा कबूल केला. आरोपी महिला म्हणाली की, "त्याने माझ्यासोबत जे काही केलं ते मी सहन केलं, पण त्याची माझ्या मुलीवर वाईट नजर असलेली मी सहन करू शकले नाही." या प्रकरणात पोलिसांनी सपना आणि तिच्या भाच्याला अटक केली आहे. तसेच मृतदेह लपवण्यासाठी मदत करणाऱ्या मित्राचा शोध घेण्यास सुद्धा सुरू आहे.










