Epstein files मधून भारतीय नेत्याचं नाव समोर, पृथ्वीराज चव्हाणांनी सगळंच सांगितलं, मोदींबाबतही भाष्य...
Prithviraj Chavan on Epstein files : पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आणखी एका ई मेलमध्ये उल्लेख आहे की, मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, एपस्टिन आणि मोदींचे काय संबंध होते की तो मोदींची कोणासोबतही भेट घडवून आणू शकत होता. या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून घ्यावं लागेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Epstein files मधून आजी-माजी खासदारांचं नाव समोर
पृथ्वीराज चव्हाणांनी सगळंच सांगितलं, मोदींबाबतही भाष्य...
Prithviraj Chavan on Epstein files : "अमेरिकेतील ट्रम्प यांच्या सरकारकडून Epstein file मधील माहिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे. जी माहिती समोर आली आहे, त्यातील काही ई-मेलमध्ये भारतीयांचे उल्लेख आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की, आजी-माजी खासदार आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका मेलमध्ये आहे. आणखी एका ई मेलमध्ये अमेरिकेतील मोठा अधिकारी आणि ट्रम्प यांचा सल्लागार असलेल्या स्टीव्ह बॅनन याचं नाव आहे. या स्टीव्ह बॅननने एपस्टिनला विनंती केली होती की मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं आहे. त्यावर मी मोदींची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो, असा रिप्लाय एपस्टिनने केला", असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य आता मुंबईकरांच्या हातात, BMC निवडणुकीत पराभव झाला तर…
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आणखी एका ई मेलमध्ये उल्लेख आहे की, मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, एपस्टिन आणि मोदींचे काय संबंध होते की तो मोदींची कोणासोबतही भेट घडवून आणू शकत होता. या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून घ्यावं लागेल. आताची परिस्थिती एवढीच आहे की, Epstein file पार्शियली ओपन करण्यात आली आहे. आणखी काही भाग ओपन व्हायला वेळ लागणार आहे. राष्ट्राध्यक्षांचं नाव असल्यामुळे ते फाईल ओपन होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची मुळे 1995-96 या काळात रोवली गेली असून, त्याची माहिती अमेरिकेत टप्प्याटप्प्याने 2005 आणि 2010 साली समोर येऊ लागली. या संपूर्ण प्रकरणामागे जेफ्री एपस्टीन नावाचा अत्यंत श्रीमंत उद्योगपती मुख्य सूत्रधार होता. एपस्टीनने अल्पवयीन मुलींना विविध आमिषे दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि प्रभावशाली, उच्च पदस्थ व्यक्तींना त्यांचा देहपुरवठा केला. या अमानुष प्रकारांमुळे अनेक पीडित मुलींनी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते.










