सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीचे तब्बल 72 तुकडे केले, अंगाचा थरकाप उडवून टाकणारी मर्डर मिस्ट्री
crime news : अनुपमा गुलाटी या महिलेची पती राजेश गुलाटीने बेदम मारहाण करत हत्या केली. तिचे तब्बल 72 तुकडे करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर तिला जन्मठेप देखील देण्यात आल्याचे वृत्त समोर आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनुपमा गुलाटी हत्याकांडानं देश हादरला
पतीने केले तब्बल 72 तुकडे
देहारादून न्यायालयाकडून आरोपी पतीला जन्मठेप
Crime News : देहारादून येथील सध्या अनुपमा गुलाटी हत्याकांड हे चर्चेत असलेले हत्याकांड आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालायने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा ही उत्तराखंड न्यायालयाने कामय ठेवली आहे. या भयानक हत्याकांडात कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते. राजेश गुलाटी यांच्यावर 17 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांची पत्नी अनुपमा गुलाटी यांची निर्घृण हत्या करून, तिच्या शरीराचे 72 तुकडे करून फ्रीजरमध्ये ठेवल्याचा आरोप होता. हे प्रकरण 12 डिसेंबर 2010 रोजी उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांच्या प्रेम जीवनात रोमँटिक क्षण येतील, तर काही राशींवर संकटांची टांगती तलवार राहील
नेमकं काय घडलं होतं?
सप्टेंबर 2017 मध्ये, देहारादून न्यायालयाने राजेश गुलाटी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर 1.5 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. न्यायालयाने 70 हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते, तसेच उर्वरित रक्कम अनुपमाची मुले पौढ होईपर्यंत बँकेत ठेवावी असे आदेश देखील देण्यात आले.
अनुपमा गुलाटीच्या हत्येचे प्रकरण 12 डिसेंबर 2010 रोजी उघडकीस आले होते, जेव्हा अनुपमाचा भाऊ दिल्लीतून देहारादूनला परतला होता. त्यानंतर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीची हत्या केल्याचं वृत्त सांगण्यात येत आहे. तिच्या शरीराचे एक दोन नाहीतर तब्बल 72 तुकडे करण्यात आले होते. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी ते तुकडे शहराच्या विविध ठिकाणी फेकून देण्यात आले होते. हा संबंधित खटला 2010 रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
2010 मध्येच पती राजेशकडून पत्नी अनुपमाला मारहाण
ऑक्टोबर 2010 मध्येच रात्री वादादरम्यान, अनुपमाचा पती राजेशने अनुपमाला मारहाण केली होती. नंतर तिचे डोकं भिंतीवर आदळण्यात आलं होतं आणि ती बेशुद्ध पडली होती. नंतर पुन्हा ती शुद्धीवर येईल आणि नंतर तक्रार देखील करेल याच भीतीने राजेशने तिची निर्घृणपणे हत्या देखील केली होती. तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवण्यात आले आणि फ्रीजमध्ये लपवण्यात आले. नंतर ते तुकडे देहारादूनच्या एका निर्जनस्थळावरील भागात विल्हेवाट करून टाकण्यात आले होते.










