पनवेलमध्ये पुरुष लेडिज डब्ब्यात शिरला, महिलांनी जाब विचारताच धावत्या लोकलमधून विद्यार्थीनीला बाहेर फेकलं, सर्वत्र संताप
Panvel Railway News : एक पुरुष पनवेल लोकलच्या लेडीज डब्यात चढला. लेडीज डब्यात चढल्याने महिलांना त्याला जाब विचारला. त्यानंतर त्या पुरुषाने क्रूरतेची सीमा गाठली आणि एका मुलीलाच लेडीज डब्यातून फेकून दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुरुष पनवेल लोकलच्या लेडीज डब्यात चढला आणि त्याने तरुणीला दिले फेकून
खांदेश्वर रेल्वे स्थानकावर मन हेलावणारा प्रकार
Panvel Railway News : एक पुरुष पनवेल लोकलच्या लेडीज डब्यात चढला. लेडीज डब्यात चढल्याने महिलांना त्याला जाब विचारला. त्यानंतर त्या पुरुषाने क्रूरतेची सीमा गाठली आणि एका मुलीलाच लेडीज डब्यातून फेकून दिले. ही घटना हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : 'या' राशींवर होणार प्रेमाचा वर्षाव, तर काही राशीतील लोकांना नोकरीत मिळणार प्रमोशन
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, जखमी झालेल्या मुलीचे नाव श्वेता महाडिक असे आहे. ती आपली मैत्रीण खारघरला कॉलेजला जात असताना ही घटना घडली. रेल्वेतील लेडीज जब्ब्यात घुसखोरी केलेल्या पुरुषाचे नाव शेख अख्तर नवाज शेख असे आहे. हे चित्र पाहून रेल्वेतील लोक भयभीत झाले. नंतर महिलांना चैन ओढली आणि रेल्वे तात्काळ थांबवण्याची विनंती केली.
खांदेश्वर रेल्वे स्थानकावर आरोपी अटकेत
नंतर महिलांनी रेल्वे हेल्पलाइन नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच, जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. श्वेता या घटनेतून थोडक्यात बचावली, परंतु तिच्या डोक्याला, कंबरेला आणि हाता - पायांना गंभीर दुखापत झाली.
हे ही वाचा : नगरसेवक झाल्यानंतर जेजुरीला गेले, पण मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, 16 जण होरपळले
या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेकदा भेडसावत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे, अशी माहिती रेल्वे एसआरपीय विजय तायडे यांनी माहिती दिली.










