नगरसेवक झाल्यानंतर जेजुरीला गेले, पण मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, 16 जण होरपळले

मुंबई तक

Jejuri Bhandara Fire News : ही घटना दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घडली. भंडाऱ्याला अचानक आग लागून त्याचा स्फोट झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांना काही कळण्याच्या आतच आगीची झळ अनेकांना बसली.

ADVERTISEMENT

नगरसेवक झाल्यानंतर जेजुरीला गेले, पण मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, 16 जण होरपळले
नगरसेवक झाल्यानंतर जेजुरीला गेले, पण मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, 16 जण होरपळले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नगरसेवक झाल्यानंतर जेजुरीला गेले

point

पण मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, 16 जण होरपळले

Jejuri Bhandara Fire News : नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरात आनंदाचे वातावरण होते. विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी परंपरेनुसार गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडारा अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र हा आनंदाचा क्षण काही सेकंदांतच भीषण दुर्घटनेत बदलला. भंडारा अर्पण करत असतानाच अचानक मोठा भडका उडाल्याने सुमारे 16 जण गंभीररीत्या होरपळले.

ही घटना दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घडली. भंडाऱ्याला अचानक आग लागून त्याचा स्फोट झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांना काही कळण्याच्या आतच आगीची झळ अनेकांना बसली. या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे, त्यांचे पती राहुल घाडगे तसेच नगरसेविका स्वरूपा खोमणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते जखमी झाले.

घटनेनंतर तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तत्काळ जेजुरीतील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींना गंभीर भाजल्यामुळे पुढील उपचारांसाठी पुण्याकडे हलवण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा : बार्शी : नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय, दिलीप सोपलांना मोठा धक्का

हे वाचलं का?

    follow whatsapp