Govt Job: भारत सरकारच्या मोठ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज...

मुंबई तक

मिनीरत्न कंपनी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) कडून असिस्टंट फोरमन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत सरकारच्या मोठ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!

point

10 वी पास उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज...

Govt Job: चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी भारत सरकारच्या कंपनीत भरती निघाली आहे. मिनीरत्न कंपनी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) कडून असिस्टंट फोरमन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना  www.nclcil.in या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 11 फेब्रुवारी 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली उमेदवार 5 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. 

पात्रता 

संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 उत्तीर्ण असण्यासोबत इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकल इंजीनिअरिंग/ इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग या क्षेत्रात 3 वर्षांचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. संबंधित फील्डमध्ये इंजीनिअरिंगची डिग्री असलेले उमेदवार सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार वेबसाइटवर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. 

हे ही वाचा: प्रफुल्ल पटेलांची फाईल क्लिअर करण्यासाठी थांबले अन् अजितदादांना उशीर झाला, ते विमानाने गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

वयोमर्यादा 

या भरतीसाठी 18 ते 30 वर्षे उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. 

कसा कराल अर्ज? 

1. संबंधित भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम www.nclcil.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, Career च्या Recruitment सेक्शनमध्ये Employment Notification for Direct Recuitment of Various Post of supervisory Staff Assistant Formen (मॅकेनिकल/ E&T/इलेक्ट्रिकल) मध्ये Apply Online लिंकवर क्लिक करा. 
3. यानंतर, अर्जाच्या लिंकवर क्लिक करताच, फॉर्मचे सर्व कॉलम ओपन होतील. 
4. आता वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा. 
5. माहिती भरल्यानंतर पासपोर्ट साइज फोटो, सही आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
6. आता अर्जाची फी भरून त्याची प्रिंटआउट काढा आणि ती भविष्यासाठी ती सुरक्षितरित्या ठेवा. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp