वैशाख अमावस्या 2026: अमावस्या पंचक संयोग, चुकूनही 'हे' करू नका नाही, तर भोगावे लागतील परिणाम
Astrology : पंचांगानुसार, 13 एप्रिल 2026 रोजी झालेला पंचक 17 एप्रिल रोजी दुपारी 12: 02 वाजेपर्यंत राहिल. त्यामुळे आमवस्येच्या दिवशी स्नान, दान आणि तर्पण विधी करण्याचा हाच काळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योगायोग दिवसाला एक दुर्मिळ प्रसंग बनवतो, या काळात सावधानता बाळगावी. पंचकात वैशाख अमावस्या येणं हा एक योगायोग आहे, ज्यामुळे काही चुकांबाबत सावधगिरी बाळगावी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'या' चुकांबाबत सावधगिरी बाळगावी
काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
Astrology : हिंदू धर्मात पूर्वजांच्या शांतासाठी आणि आध्यात्मिक शु्द्धीकरणासाठी वैशाख अमावस्येची तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जाते. द्रिक पंचांगानुसार, वैशाख अमावस्या 17 एप्रिल रोजी येत आहे. पंचांगानुसार, 13 एप्रिल 2026 रोजी झालेला पंचक 17 एप्रिल रोजी दुपारी 12: 02 वाजेपर्यंत राहिल. त्यामुळे आमवस्येच्या दिवशी स्नान, दान आणि तर्पण विधी करण्याचा हाच काळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योगायोग दिवसाला एक दुर्मिळ प्रसंग बनवतो, या काळात सावधानता बाळगावी. पंचकात वैशाख अमावस्या येणं हा एक योगायोग आहे, ज्यामुळे काही चुकांबाबत सावधगिरी बाळगावी.
हे ही वाचा : 15 वर्षीय चुलत भावाने साडे तीन वर्षांच्या चुलत बहिणीला सोडलं नाही, आई बाहेर गेल्यानंतर नको तेच... गुप्तांगाला झाली जखम
'या' चुकांबाबत सावधगिरी बाळगावी
शुभकार्य करू नका : पंचकात अमावस्या दिनी लग्नसराई, साखरपुडा, गृह प्रवेश असे कार्यक्रम करू नका.
लाकूड किंवा कोणतंही इंधन खरेदी करू नये : या अशुभ परिस्थितीत कोणतंही इंधन खरेदी करू नये. जसे की, गॅस, कोळसा. या खरेदीमुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होईल.
बांधकाम करू नये : या स्थितीत कोणतंही बांधकाम करू नये, कारण ते योग्य मानले जाणार नाही. त्याला अशुभ मानले जाईल.









