एअर इंडिया विमानाचा अपघात जाणूनबुजून घडवला? पायलटनेच फ्यूएल स्विच बंद केल्याचा दावा...

मुंबई तक

एअर इंडिया फ्लाइट क्रॅशच्या तपासादरम्यान महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे झाला नसून, जाणूनबुजून केलेल्या कृत्यामुळे झाल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढला आहे.

ADVERTISEMENT

एअर इंडियाचा अपघात जाणूनबुजून घडवला?
एअर इंडियाचा अपघात जाणूनबुजून घडवला?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एअर इंडियाचा अपघात जाणूनबुजून घडवला?

point

पायलटनेच फ्यूएल स्विच बंद केल्याचा दावा...

Air India plane crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट क्रॅशच्या तपासादरम्यान महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे झाला नसून, जाणूनबुजून केलेल्या कृत्यामुळे झाल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढला आहे. इटालियन दैनिक वृत्तपत्र Corriere della Sera यांनी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील चर्चेशी परिचित असलेल्या दोन सूत्रांचा हवाला देत हे वृत्त दिल्याची माहिती आहे.

वृत्तानुसार, भारतीय तपासकर्त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की 12 जून 2025 रोजी इंजिनमध्ये इंधनाचा पुरवठा बंद पडल्यानंतर झालेला अपघात यांत्रिक बिघाडामुळे नव्हता तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला होता. अधिकारी आता आपल्या अंतिम अहवालाचा ड्राफ्ट बनवण्याच्या तयारीत आहेत. वृत्तपत्राने पुढे म्हटलं आहे की, तपासात मदत करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षाला मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. 

एअर इंडियाचा बोइंग 787 ड्रीमलाइनर, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांनी क्रॅश झाला. या अपघातात एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात प्रवासी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात उपस्थित असलेल्या लोकांचा देखील समावेश होता. या दुर्घटनेत केवळ एका प्रवाशाचा सुदैवाने जीव वाचला. 

जुलै 2025 मध्ये भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात पायलटने फ्यूल कंट्रोल बंद केल्याबद्दलच्या शेवटच्या कॉकपिट संभाषणाचा उल्लेख केला होता. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये ऐकू आलं की, एका पायलटने विचारले, "फ्यूएल का बंद केलं?" तर दुसऱ्याने उत्तर दिले, "मी नाही केलं." 

हे वाचलं का?

    follow whatsapp