मोठी बातमी! अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत असताना आता एक हादरवणारी बातमी समोर आली. खरातचे निकटवर्तीय असलेल्या जितेंद्र शेळके यांचा अपघाती जागीच मृत्यू झालाय. शेळके हे खरातचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी त्यांची ईडीकडून तपासणी झाली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत असताना आता एक हादरवणारी बातमी समोर आली. खरातचे निकटवर्तीय असलेल्या जितेंद्र शेळके यांचा अपघाती जागीच मृत्यू झालाय. शेळके हे खरातचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी त्यांची ईडीकडून तपासणी झाली होती. शेळके हे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष देखील होते. आता शेळके यांच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि एकूणच खरात प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची देखील शक्यताय. यावरुन अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केला.
हे ही वाचा : मोठी बातमी! पिकलेले केस अन् तोंडाला मास्क, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला शेळकेंच्या कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या भीषण अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला . अपघातात त्यांच्या पत्नी आणि मुलगा गंभीर असल्याची माहिती आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झालाय, अपघाताची दृश्य पाहून याची भीषणता जाणवतेय. त्यांची पत्नी बराच वेळ कारमध्ये अडकलेली होती, त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
शेळके हे गेल्या काही दिवसांपासून लैंगिक शोषण आणि अनेक बड्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना लुबाडल्याने चर्चेत आलेल्या अशोक खरातचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. खरात याच्या 'शिवनिका ट्रस्ट'चे ते उपाध्यक्ष होते. याशिवाय, शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मोठ्या मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांनाही धक्का बसला असता...", त्या टोमण्यावर अमित शाहाही गदागदा हसले!
अपघातावर अंजली दमानिया काय म्हणाल्या?
अपघाताची माहिती मिळताच दमानिया यांनी हा घात असल्याचं म्हटलं. आता महत्त्वाच्या लोकांना प्रोटेक्शन मिळावं हा घात आहे असं प्रथमदर्शनी वाटतंय. 'शेळके यांना तीन भाऊ आहेत, त्यापैकी जितेंद्र शेळके यांचे अशोक खरातसोबतच मंगल कार्यालयात पार्टनरशीप होती. यांचा जर असा घात झाला असेल तर हे अतिशय धक्कादायक आहे. असे किती घात अपघात बघायला मिळतील, काही राजकारणी माणसांची नावे देखील आहेत. यात एकेकाला एलिमिनेट करण्याची वेळ आली आहे,' असं अंजली दमानिया यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ईडीची चौकशी झालेली हा योगायोग असू शकत नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे.









