अमरावती सेक्स स्कँडल : भाड्याने घेतलेला फ्लॅट ते कॅफे...'डर्टी खेळ', 400 रुपयांत मिळायची 'प्रायव्हेट जागा'
Amravati sex scandal : परतवाडा सेक्स स्कँडलमध्ये आरोपी अयानने भाड्याच्या फ्लॅटपासून कॅफेपर्यंत जाळे पसरवल्याचे उघड झाले असून, 400 रुपयांत 'प्राइव्हेट कंपार्टमेंट' उपलब्ध करून दिले जात होते. अमरावती, अचलपूर आणि वझ्झर डॅम परिसरातील विविध ठिकाणी पीडित मुलींचे शोषण झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमरावती सेक्स स्कँडल : भाड्याने घेतलेला फ्लॅट ते कॅफे..
.'डर्टी खेळ', 400 रुपयांत मिळायची 'प्रायव्हेट जागा'
Amravati sex scandal : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या खळबळजनक सेक्स स्कँडल प्रकरणातील तपासात आता दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान याचे गुन्हेगारी नेटवर्क केवळ एका भाड्याच्या फ्लॅटपुरते मर्यादित नसून, ते विविध कॅफे आणि डॅम परिसरापर्यंत पसरल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी अयान पीडित मुलींना अमरावतीमधील कठोरा रोड येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये नेऊन त्यांचे शारीरिक शोषण करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकून पंचनामा केला असून, दीर्घकाळापासून या जागेचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी फ्लॅट मालकालाही चौकशीसाठी पाचारण केले असून, या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे याचा सखोल शोध आता पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे.
कॅफेमधील 'प्राइवेट कंपार्टमेंट' आणि अश्लील कृत्यांचे जाळे
आरोपी अयानच्या या 'काळ्या कृत्यांचे' धागेदोरे आता शहरातील विविध कॅफेपर्यंत पोहोचले असून, तिथे चालणाऱ्या संशयास्पद हालचालींनी सर्वांनाच हादरवून सोडले आहे. तपासादरम्यान असे दिसून आले आहे की, अयान पीडित मुलींना अमरावतीमधील 'कॅफे रॉयल 10', अचलपुरमधील 'कॅफे फ्रेंड्स टाउन' आणि परतवाड्यातील बंद पडलेल्या 'कॅफे सोशल जंक्शन'मध्ये घेऊन जात असे. विशेष म्हणजे, अमरावती येथील 'कॅफे रॉयल 10' मध्ये आरोपी अयान कॅफे मालकाला केवळ 400 रुपये देऊन मुलींसोबत बसण्यासाठी 'प्राइवेट कंपार्टमेंट' भाड्याने घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या कॅफेमध्ये कपल्ससाठी स्वतंत्र आणि बंद कंपार्टमेंटची व्यवस्था करण्यात आली होती, जिथे पीडित मुलींसोबत अश्लील चाळे केले जात होते. पोलिसांनी या सर्व कॅफेमध्ये आरोपीला नेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून, कॅफे संचालकांचीही कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा : सरकारी डॉक्टरचे विवाहित नर्ससोबत अनैतिक संबंध, शेवटी व्हायचं तेच झालं; भयंकर घडलं
वझ्झर डॅम गार्डन ते अचलपूरपर्यंत पसरलेला तपास
या प्रकरणाची व्याप्ती केवळ बंद खोल्यांपर्यंतच मर्यादित नसून, आरोपीने सार्वजनिक ठिकाणांचाही गैरवापर केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एका पीडित मुलीशी अयानची भेट वझ्झर डॅमच्या गार्डनमध्ये झाली होती, अशी माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आहे. अचलपूर येथील बंद असलेल्या 'कॅफे फ्रेंड्स टाउन'च्या समोरूनही पोलिसांनी तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, आरोपीने पीडित मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांचे शोषण करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांचा पद्धतशीरपणे वापर केला होता. पोलीस आता या प्रकरणातील प्रत्येक लोकेशनचा बारीक अभ्यास करत असून, या नेटवर्कमध्ये आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, या दिशेने तपास चक्रावत आहे.









