'तिचा नाद सोडा...' सरपंच पत्नीच्या नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी प्रेमसंबंध, कंटाळलेल्या बायकोनं उचललं टोकाचं पाऊल

मुंबई तक

extramarital affair : महिला संरपंचाने आपला पती इसरत आली याच्या प्रेमसंबंधाच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या प्रेमसंबंधाच्या त्रासाला कंटाळून पत्नीचं टोकाचं पाऊल

point

पतीसह काही जणांनी मिळून केला महिलेचा छळ 

extramarital affair : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. राहिल परवीन नावाच्या एका महिला संरपंचाने आपला पती इसरत आली याच्या प्रेमसंबंधाच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, ती तिच्या पतीला प्रेमसंबंध संपवून त्यांच्या वैवाहिक जीवनावर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती करत होती. नंतर वारंवार विनंती करूनही त्याने काहीही एक ऐकलं नाही, नंतर आत्महत्या केली. मृत महिलेच्या कुटुंबाने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती इशरतला अटक करण्यात आली.

हे ही वाचा : पनवेलमध्ये पुरुष लेडिज डब्ब्यात शिरला, महिलांनी जाब विचारताच धावत्या लोकलमधून विद्यार्थीनीला बाहेर फेकलं, सर्वत्र संताप

नेमकं काय घडलं? 

राहिल परवीनचा विवाह बिजनोरच्या मेवनवाडा गावात इशरत अलीशी झाला होता. परवीन ही गावची प्रमुख महिला होती. लग्नानंतर काही काळातच मृत महिलेला आपल्या पतीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचे कळले होते. परवीनने तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीला सोडून त्यांच्या वैवाहिक जीवनावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं होतं, पण त्याने तिला नकार दिला. दररोजच्या वादांमुळे आणि तिच्या पतीच्या अशा वागण्याने राहिल ही मानसिक तणावाखाली आपलं जीवन जगू लागली होती. याच त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

पतीसह काही जणांनी मिळून केला महिलेचा छळ 

मृताच्या कुटुंबाने या प्रकरणात हत्येचा कट रचल्याचे सांगत न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने केलेल्या हस्तक्षेपानंतर, तक्रारीवरून 27 नोव्हेंबर रोजी सिओहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कुटुंबाने आरोप केला की, महिलेचा पती इशरत अली आणि इतर काही जणांनी मिळून तिचा छळ केला होता.

पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर मृतदेह हा शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून हे स्पष्ट झाले की, पतीची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि गंभीर होती. तसेच इतर नाव असलेल्या व्यक्तींच्या सहभागाचे कोणतेही पुरावे सापडले गेले नाहीत. तसेच याच तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणात कलम 108 (BNS) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp