लग्न होण्यापूर्वीच दोघे हॉटेलमध्ये गेले... पण, बाहेर निघताना भावाने रंगेहात पकडलं अन् घडलं भयानक!
आरोपीने त्याच्या बहिणीला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हॉटेलमधून बाहेर निघताना पाहिलं आणि याच रागातून त्याने भयंकर कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्न होण्यापूर्वीच दोघे हॉटेलमध्ये गेले
पण, बाहेर निघताना भावाने रंगेहात पकडलं अन्...
अखेर घडली भयानक घटना
Crime News: एका तरुणाने आपल्या मित्रासोबत मिळून त्याच्या होणाऱ्या दाजीची निर्घृण हत्या केल्याची बातमी उघडकीस आली आहे. खरं तर, आरोपीच्या बहिणीचे पीडित तरुणासोबत तीन वर्षांपासून प्रेससंबंध होते आणि त्यांचं एकमेकांसोबत लग्न सुद्धा ठरलं होतं. मात्र, एके दिवशी आरोपीने त्याच्या बहिणीला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हॉटेलमधून बाहेर निघताना पाहिलं आणि याच रागातून त्याने हे भयंकर कृत्य केलं.
बहिणीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पाहिलं अन्...
संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडली असून खुर्शीद नावाच्या एका तरुणाने अहमद जहान याला गोळी घालून संपवल्याची माहिती आहे. अहमदचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरू असून त्यांचं लग्न सुद्धा ठरलं होतं. मात्र, हे लग्न खुर्शीदला मान्य नव्हतं. दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी आरोपी खुर्शीदने त्याच्या बहिणीला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हॉटेलमधून बाहेर निघताना पाहिलं. यामुळे, आरोपी प्रचंड संतापला आणि त्याने अहमदचा काटा काढण्याचं ठरवलं.
हे ही वाचा: पुणे: घर सोडून प्रियकराकडे गेली, पण तरुणाची विवाहित प्रेयसीकडे भलतीच मागणी! नकार मिळताच थेट...
गोळीबार आणि पीडित तरुणाचा जागीच मृत्यू
खुर्शीदने त्याच्या मित्राला हत्येच्या या योजनेत सहभागी करून घेतलं. दोघांनी अहमदला फूस लावून शहराबाहेर नेलं आणि तिथे संधी साधून आरोपींनी पीडित तरुणावर गोळीबार केला. या हल्ल्यात अहमदचा जागीच मृत्यू झाला. पटेल नगर ग्राउंडवर संशयास्पद अवस्थेत अमहदचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृताच्या कुटुंबियांनी त्वरीत पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा: मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे! स्थानिकांकडून चांगलाच चोप...
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि कॉल डिटेल्सच्या मदतीने तपास सुरू केला आहे. मृताच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, टेक्निकल पुरावे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी खुर्शीद आणि त्याचा साथीदार अयान यांना अटक केली. कठोर चौकशीदरम्यान, दोघांनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी दोघांची तुरुंगात रवानगी केली आहे. आता या प्रकरणासंबंधी आवश्यक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.










