पुणे: घर सोडून प्रियकराकडे गेली, पण तरुणाची विवाहित प्रेयसीकडे भलतीच मागणी! नकार मिळताच थेट...
पुण्यातून विवाहबाह्य प्रेमसंबंधाचं भलतंच प्रकरण समोर आलं आहे. तरुणीने त्याच्या विवाहित प्रेयसीकडे वेगळीच मागणी केली आणि ती पूर्ण न केल्याने त्याने तिच्यासोबत भयंकर कृत्य केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घर सोडून आलेल्या प्रेयसीकडे तरुणाची भलतीच मागणी
मागणी पूर्ण न झालेल्या प्रियकराचं भयंकर कृत्य
पुण्यातील धक्कादायक प्रकरण
Pune Crime: पुण्यातून विवाहबाह्य प्रेमसंबंधाचं भलतंच प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाने त्याच्या विवाहित प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही पुण्यातील काळेवाडीच्या ज्योतिबानगरमधील अमरदीप कॉलनीत घडल्याची माहिती आहे. पीडितेने त्याच्या प्रियकराची मागणी पूर्ण न केल्याने तिला मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
आरोपीची प्रेयसीकडे भलतीच मागणी...
प्रकरणातील पीडित महिला ही विवाहित असून तिचे आरोपी तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. प्रियकराच्या प्रेमात आंधळी झालेली पीडिता ही चार दिवसांपूर्वीच तिचं घर सोडून प्रियकराकडे राहण्यासाठी आली होती. आरोपीचं नाव संदेश चोपडे असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी संदेशने आपल्या प्रेयसीकडे एक भलतीच मागणी केली. पीडितेच्या आरोपानुसार, तिच्या प्रियकराने तिला तिच्या सासूचं घर विकून पैसे आणून देण्याची मागणी केली होती. मात्र, महिलेने तिच्या प्रियकराच्या या मागणीला नकार दिला.
हे ही वाचा: मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे! स्थानिकांकडून चांगलाच चोप...
मोठ्या कुलूपाने पीडितेच्या डोक्यात वार
पीडितेने आरोपीच्या मागणीला नकार दिल्यानंतर संदेश प्रचंड संतापला आणि त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला. याच वादातून आरोपी प्रियकराने रागाच्या भरात पीडितेला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेगम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, तिला जीवे मारून टाकण्याच्या उद्देशाने त्याने घरातील मोठ्या कुलूपाने तिच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात पीडित महिला गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा: विवाहितेने रात्री 2 वाजता प्रियकराला घरी बोलवलं, पण अचानक पतीने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् नंतर...
आरोपी प्रियकराला अटक
त्यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित महिलेने काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी संदेश चोपडे याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.










