मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे! स्थानिकांकडून चांगलाच चोप...

मुंबई तक

मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील एका मैदानात पोलिसाने महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे!
पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे!

point

स्थानिकांकडून आरोपी पोलिसाला चांगलाच चोप...

Mumbai Crime: मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील एका मैदानात पोलिसाने महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटना ही सोमवारी संध्याकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या एका मैदानात घडली. घटनेतील पीडित महिला ही गंतीमंद असून ऑन ड्यूटी गणवेशात असलेल्या पोलिसाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी, येणा-जाणाऱ्या स्थानिकांनी ते पाहिलं आणि आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. 

पोलिसाची गतीमंद पीडितेसोबत अश्लील कृत्ये

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळच ताडदेव आरटीओकडे जाणाऱ्या साने गुरूजी मार्गावर महापालिकेचं भाऊसाहेब हिरे हे उद्यान आहे. दररोज या मैदानात स्थानिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी तसेच लहान मुले सुद्धा खेळण्यासाठी येत असतात. मात्र, याच उद्यानात पोलीस अधिकाऱ्याने गतीमंद पीडितेसोबत अश्लील कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: विवाहितेने रात्री 2 वाजता प्रियकराला घरी बोलवलं, पण अचानक पतीने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् नंतर...

नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला... 

सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पीडिता उद्यानात बाकावर बसली असताना वर्दीतील एक पोलीस तिच्याजवळ बसला आणि तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. काही वेळाने, आरोपीने पीडितेसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली पण त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी ते पाहिलं आणि त्यांनी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला. 

हे ही वाचा: मतदानाला EVM वर उमेदवाराचं नावच अन् मतमोजणीच्या दिवशी गायब, तरीही निकाल जाहीर... 7 कर्मचारी तडकाफडकी निलंबित

आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

यानंतर, नागरिकांनी उद्यानाला लागूनच असलेल्या ताडदेव पोलीस चौकीत घटनेची माहिती दिली आणि प्रकरणाबद्दल कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. ताडदेव पोलिसांनी तात्काळ आरोपी पोलिसाला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. आरोपी हा नशेत असून त्याने गतीमंद पीडितेसोबत अश्लील कृत्य केल्याची माहिती आहे. आरोपी सहाय्यक फौजदार हा पोलिसांच्या सशस्त्र विभागात कार्यरत असून तो सध्या विभाग 2 येथे नेमणूकीस असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp