मतदानाला EVM वर उमेदवाराचं नाव अन् मतमोजणीच्या दिवशी गायब, तरीही निकाल जाहीर... 7 कर्मचारी तडकाफडकी निलंबित
भंडारा नगर परिषद निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी EVM वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचे नाव गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे 7 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

भंडारा: भंडारा नगर परिषद निवडणुकीदरम्यान EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रक्रियेत मोठा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव EVM मशीनवरच दिसले नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली.
काय आहे पूर्ण प्रकरण?
निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान ही बाब समोर आली की, उमेदवाराचे नाव EVM मध्ये नसल्याने त्या प्रभागात मोठा गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ निवडणूक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलली. प्रभाग 3 मधील मतदान प्रक्रियेवर परिणाम झाल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला.
हे ही वाचा>> 'कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर...', पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट चर्चेत
प्रशासनाची मोठी कारवाई
- 7 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
- 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. जो कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा>> कल्याणात धुमशान, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आधी एकमेकांचं काढलं रक्त... तासाभरातच दोघांचे गळ्यात गळे!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, "ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाईची मागणी करत आहोत."










