'कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर...', पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

मुंबई तक

Nitesh Rane facebook post : “गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी. पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात… आता ती वेळ आली आहे,” अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली असून, या वक्तव्यातून येणाऱ्या काळात ते आक्रमक भूमिका घेणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

Nitesh Rane facebook post
Nitesh Rane facebook post
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर...'

point

पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

Nitesh Rane facebook post : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीतील निकालाचा धक्का बसल्यानंतर त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सूचक भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे.

“गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी. पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात… आता ती वेळ आली आहे,” अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली असून, या वक्तव्यातून येणाऱ्या काळात ते आक्रमक भूमिका घेणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मालवण अन् कणकवलीमध्ये नितेश राणेंचा पराभव

वेंगुर्ले नगरपालिकेत भाजपने आपला गड अबाधित राखला. येथे भाजपचे दिलीप ऊर्फ राजन गिरप यांनी विजय मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. चौरंगी लढतीत काँग्रेसचे ताकदवान उमेदवार विलास गावडे यांना अपेक्षित यश मिळाले नाही आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

मालवणमध्ये मात्र शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले. आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी मोठा विजय मिळवला. ठाकरे गटाच्या पूजा करलकर यांचा येथे पराभव झाला, तर भाजपच्या शिल्पा खोत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp