विवाहितेने रात्री 2 वाजता प्रियकराला घरी बोलवलं, पण अचानक पतीने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् नंतर...
महिलेने तिच्या प्रियकराला रात्री 2 वाजता घरी भेटण्यासाठी बोलवलं. पण त्यावेळी अचानक पती घरी पोहोचला पत्नीला त्याच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर, त्यांच्या वादातून भयंकर घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विवाहितेने रात्री 2 वाजता प्रियकराला घरी बोलवलं
अचानक पतीने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्..
विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना
Crime News: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात घडली असून राहूल नावाचा एक तरुण त्याची पत्नी रूबी आणि मुलांसह चंदौसीच्या चुंगी परिसरात राहत होता. मात्र, रूबीचे गौरव नावाच्या एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. 17 नोव्हेंबरच्या रात्री पती घरी नसताना महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलवलं होतं. मात्र, त्यावेळी राहूल अचानक त्याच्या घरी पोहोचला आणि पत्नीला त्याच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर, त्यांच्या वादातून भयंकर घटना घडली.
पतीने रंगेहात पकडलं अन् निर्घृण हत्या...
पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर, राहूलला त्याचा राग अनावर झाला. त्यांच्यात वाद सुरू झाला आणि रूबीने जवळ असलेला लोखंडी रॉड उचलून पती राहुलच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी, राहुलचा जागीच मृत्यू झाला. आरोपी पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्यानंतर, गौरव कटर मशीन घेऊन आला आणि त्याने अतिशय निर्दयी कृत्य केलं. पत्नी आणि प्रियकराने मिळून कटरच्या साहाय्याने आधी राहुलचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि हात पाय सुद्धा कापून टाकले. त्यानंतर, रूबीने दोन काळ्या बॅग्स आणल्या. त्यातील एका बॅगेत राहुलचं डोकं आणि हात-पाय भरून 50 किमी दूर असलेल्या नदीत फेकून दिलं. तसेच दुसऱ्या बॅगेत पीडित तरुणाचं धड भरून एका शेतात फेकून दिला.
हे ही वाचा: पुजाऱ्याला अटक! मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 'त्या' रुममध्येच घडला प्रकार
पती बेपत्ता असल्याची तक्रार
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून रूबीने 24 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, 15 डिसेंबर रोजी पोलिसांना डोकं आणि हात-पाय नसलेला कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर आव्हान होतं. पोलिसांनी रूबीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि मृतदेहाच्या कपड्यावरून आरोपी महिलेने तो राहुल नसल्याचं पोलिसांना सांगितलं.
हे ही वाचा: मुंबई : बाळ चोरणारा समजून बुरखा घातलेल्या माणसाला मारहाण, पण प्रकरण वेगळंच निघालं
महिलेच्या फोनवरून सत्य उघडकीस
पण रुबीच्या मोबाईल फोनवरून सत्य घटना उघडकीस आली. तिच्या फोनमध्ये राहुल आणि रूबी एकत्र असलेला फोटो सापडला आणि मृतदेहावर जे कपडे होते, तेच कपडे राहुलने त्या फोटोत घातल्याचं दिसून आलं. तेव्हा पोलिसांना रूबीवर संशय आला आणि पोलिसांच्या कठोर चौकशीनंतर महिलेने तिचा गुन्हा कबूल केला. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, संबंधित घटनेतील आरोपी रूबी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.










