मुंबई : बाळ चोरणारा समजून बुरखा घातलेल्या माणसाला मारहाण, पण प्रकरण वेगळंच निघालं

मुंबई तक

Mumbai Crime News : परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पार्कसाइट पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली.

ADVERTISEMENT

Mumbai Crime News
Mumbai Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : बाळ चोरणारा समजून बुरखा घातलेल्या माणसाला मारहाण

point

पण प्रकरण वेगळंच निघालं, बुरख्याचं कारणही समोर

Mumbai Crime News :  मुंबईतील पार्कसाइट परिसरात बुधवारी सकाळी अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळात एका निष्पाप व्यक्तीला जमावाच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागल्याची गंभीर घटना घडली. बुरखा परिधान करून फिरत असलेल्या एका व्यक्तीला ‘लहान मुलांना चोरणारा’ असल्याच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी पकडले आणि बेदम मारहाण केली. मात्र, पोलिसांच्या तपासात या घटनेमागील सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

अधिकची माहिती अशी की, बुधवारी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास पार्कसाइट परिसरात एक व्यक्ती बुरखा घालून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. याच दरम्यान परिसरात बाळ चोरीच्या अफवा आधीच पसरलेल्या असल्याने नागरिकांचा संशय अधिक बळावला. काही वेळातच ‘बाळ चोर आला आहे’ अशी ओरड सुरू झाली आणि क्षणातच मोठा जमाव जमा झाला. कोणतीही खात्री न करता जमावाने त्या व्यक्तीला पकडून मारहाण सुरू केली.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पार्कसाइट पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली.

पोलिस तपासात संबंधित व्यक्तीची ओळख तौसीफ मोहम्मद शेख (वय 33) अशी पटली. तो व्यवसायाने रिक्षाचालक असून पार्कसाइटमधीलच चंद्रभागा सोसायटीत राहणारा आहे. चौकशीत तौसीफने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्याने काही प्रवाशांना आनंदगड नाका येथे सोडले होते. मात्र भाड्याच्या पैशांवरून त्याचा त्या प्रवाशांशी वाद झाला आणि त्यांनी पैसे न देता पळ काढला. त्या व्यक्तींना ओळखता यावे आणि ते सापडावेत, यासाठी आपली ओळख लपवण्याच्या उद्देशाने त्याने बुरखा परिधान केल्याचे तौसीफने सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp