BMC Election 2026: शिवसेनेने बहुमत नसतानाही कसं मिळवलेलं 2017 मध्ये मुंबईचं महापौर पद? सगळा इतिहास अन् इंटरेस्टिंग माहिती
BMC Election 2017 History: मुंबई महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. जाणून घ्या याच निवडणुकीविषयी आणि महापालिकेतील पक्षीय बलाबलबाबत.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, तिच्या निवडणुका नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असतात. 2017 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट मुकाबला झाला होता. ही निवडणूक 21 फेब्रुवारी 2017 रोजी एकाच टप्प्यात पार पडली, तर निकाल 23 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक झाली, ज्यात मतदारांची संख्या सुमारे 91.8 लाख होती. तर मतदानाची टक्केवारी 55.34% इतकी नोंदवली गेली, जी गेल्या 25 वर्षांतील सर्वोच्च होती.
निकाल: शिवसेना सर्वात मोठा पक्ष, भाजपची जोरदार मुसंडी
2017 च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत (114 जागा) मिळाल्या नाही. तरीही शिवसेनेने सलग दुसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली. 2012 मध्ये शिवसेनेला 75 जागा मिळाल्या होत्या, तर 2017 मध्ये त्या 84 वर पोहोचल्या. भाजपने मात्र मोठी झेप घेत 2012 च्या 31 जागांवरून 82 जागा जिंकल्या, ज्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली.
पक्षनिहाय जागांचे बलाबल (227 जागा):
- शिवसेना: 84 जागा (सर्वात मोठा पक्ष)
- भारतीय जनता पार्टी (BJP): 82 जागा
- काँग्रेस: 31 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP): 9 जागा
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS): 7 जागा
- समाजवादी पार्टी (SP): 6 जागा
- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM): 3 जागा
- अखिल भारतीय सेना: 1 जागा
- अपक्ष व इतर: 4 जागा
ही निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय वैमनस्याची सुरुवात मानली जाते. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढत दिली होती, तरीही निकालानंतर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
शिवसेनेने मिळवलेलं महापौर पद
बीएमसीमध्ये महापौराची निवड नगरसेवकांकडून (कॉर्पोरेटर्स) थेट होते. महापौराचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो. 2017 च्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी 8 मार्च 2017 रोजी निवडणूक झाली होती.










