कामाचं आमिष दाखवून महिलेला 'त्या' घरात नेलं, नंतर खोलीचा दरवाजा बंद करून सामूहिक बलात्कार...
एका महिलेला 500 रुपयांच्या रोजंदारीचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कामाचं आमिष दाखवून महिलेला 'त्या' घरात नेलं
खोलीचा दरवाजा बंद करून सामूहिक बलात्कार...
Crime News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेला 500 रुपयांच्या रोजंदारीचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित पीडितेला एका निर्माणाधीन घरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी आधी महिलेचा फोन हिसकावून घेतला आणि नंतर खोलीत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. पीडित महिलेने आरोपींच्या कृत्याला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, तिला जीवे मारण्याची सुद्धा धमकी देण्यात आली. प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
निर्माणाधीन घरात पीडितेवर सामूहिक बलात्कार
संबंधित घटना ही झाशीच्या नवाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मढिया परिसरात घडली. येथे एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडिता ही तालपूरा परिसरात भाड्याच्या घरात राहत असून मजूरीचं काम करून ती आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होती. महिलेचा पती अधिक काळापासून आजारी होता आणि याच कारणामुळे ती कामाच्या शोधात इतर मजुरांसोबत उभी राहायची.
हे ही वाचा: मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे! स्थानिकांकडून चांगलाच चोप...
500 रुपयांच्या रोजंदारीच्या कामाचं आमिष
महिलेच्या दिराने दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर रोजी पीडिता मजूरीच्या कामासाठी कल्व्हर्टवर उभी होती. दरम्यान, आरोपी व्यक्ती तिथे पोहोचली आणि पीडित महिलेला 500 रुपयांच्या रोजंदारीच्या कामाचं आमिष दाखवून तिथल्या निर्माणाधीन घरात घेऊन गेला. त्या ठिकाणी काम सुरू असून, वेळेवर पैसे दिले जाणार असल्याचं तिला सांगण्यात आलं. त्या घरात आधीच तीन तरुण उपस्थित होते. त्यानंतर, महिलेला सिमेंटचं पोतं उचलण्याच्या बहाण्याने खोलीत पाठवण्यात आलं. नंतर, घरमालक अलीम आणि त्याचा साथीदार हरिश्चंद्र यांनी दरवाजा बंद केला. आरोपींनी महिलेचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी! BSF कडून 'या' पदांसाठी भरती जाहीर...
पोलिसांचा तपास
आरोपींच्या कृत्याला महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, तिला दातांनी चावून जखमी केलं गेलं. बलात्कार केल्यानंतर, आरोपींनी महिलेला पोलिसात तक्रार केल्यास जावे मारण्याची धमकी सुद्धा दिली. महिलेने धाडस करून संपूर्ण घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली. सोमवारी तिच्या कुटुंबियांनी तिला नवाबद पोलिस ठाण्यात नेऊन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेच्या दिराने त्यातील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे.










