Govt Job: 10 वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी! BSF कडून 'या' पदांसाठी भरती जाहीर...

मुंबई तक

सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) कडून स्पोर्ट्स कोटा अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या 549 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

BSF कडून 'या' पदांसाठी भरती जाहीर...
BSF कडून 'या' पदांसाठी भरती जाहीर...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

10 वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी!

point

BSF कडून 'या' पदांसाठी भरती जाहीर...

BSF Recruitment: भारतीय सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) कडून स्पोर्ट्स कोटा अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या 549 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 27 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारी 2026 पर्यंत BSF च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. 

BSF मध्ये स्पोर्टस कोटाअंतर्गत भरती 

पुरुष खेळाडूंसाठी 277 आणि महिला खेळाडूंसाठी 272 अशा एकूण 549 पदांसाठी भरती केली जाणार आहे. BSF च्या या स्पोर्ट्स कोटा भरतीमध्ये 30 हून अधिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी, फूटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, शूटिंग, पोहणे आणि योग सारख्या खेळांचा समावेश आहे.

वयोमर्यादा   

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट 2025 या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. एससी (SC)/एसटी (ST) उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना  3 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. 

हे ही वाचा: लग्न होण्यापूर्वीच दोघे हॉटेलमध्ये गेले... पण, बाहेर निघताना भावाने रंगेहात पकडलं अन् घडलं भयानक!

किती मिळेल वेतन? 

या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल-3 अंतर्गत दरमहा 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिलं जाईल. याव्यतिरिक्त, इतर सरकारी भत्ते आणि सुविधा सुद्धा मिळतील. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सामान्य (General) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 159 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC)/एसटी (ST) प्रवर्गातील आणि महिला उमेदवारांना कोणत्याच प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp