गोंदिया : मॅडम 'तो' तुम्हाला 'लॉलीपॉप' म्हणाला, विद्यार्थीनीने सांगताच गैरसमज झाला; शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Gondia Crime News : अधिकची माहिती अशी की, धैर्य मनोज मिश्रा (वय 9) हा दुपारच्या सुट्टीदरम्यान वॉशरूमकडे जात असताना त्याच्या मित्राकडे असलेल्या लॉलीपॉपबाबत बोलत होता. गोंदियातील ग्रामीण भागात लॉलीपॉपला ‘चूपरी’ असे संबोधले जाते. धैर्यने आपल्या मित्राला “माझी चूपरी मला दे” असे म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र हे शब्द जवळ उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीने ऐकले आणि तिला धैर्यने शिक्षिका शोभा गिरडकर यांना ‘चूपरी’ म्हटल्याचा गैरसमज झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गोंदिया : मॅडम 'तो' तुम्हाला 'लॉलीपॉप' म्हणाला
विद्यार्थीनीने सांगताच गैरसमज झाला
शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका गैरसमजातून शिक्षकेने 9 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्याच्या आईने आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा : 23 वर्षीय तरुणाचे 7 वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार, मशिदीच्या छतावर नेत नको तेच... सीसीटीव्हीतून सत्य आलं समोर
गैरसमज झाल्याने घडला प्रकार
अधिकची माहिती अशी की, धैर्य मनोज मिश्रा (वय 9) हा दुपारच्या सुट्टीदरम्यान वॉशरूमकडे जात असताना त्याच्या मित्राकडे असलेल्या लॉलीपॉपबाबत बोलत होता. गोंदियातील ग्रामीण भागात लॉलीपॉपला ‘चूपरी’ असे संबोधले जाते. धैर्यने आपल्या मित्राला “माझी चूपरी मला दे” असे म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र हे शब्द जवळ उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीने ऐकले आणि तिला धैर्यने शिक्षिका शोभा गिरडकर यांना ‘चूपरी’ म्हटल्याचा गैरसमज झाला. त्या विद्यार्थिनीने ही बाब संबंधित शिक्षिकेला सांगितल्यानंतर शिक्षिकेने धैर्यला बोलावून घेतले आणि त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमुळे धैर्य घाबरून गेला असून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. शाळेतून घरी आल्यानंतर धैर्यने झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली.
पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल










