वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आणि कुठे दिसणार? ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने विशेष स्थिती, काय घडणार?

मुंबई तक

Solar Eclipse 2026 : लवकरच वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. ग्रहणाच्या वेळी सूर्यदेव कुंभ राशीत विराजमान असतील, म्हणून ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने ही स्थिती विशेष मानली जात आहे. ही घटना विज्ञानासाठी जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीनेही खास मानली जाते. या ग्रहणाबद्दल अनेकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होत आहेत.  हे ग्रहण प्रभावशाली असेल का? यामुळे घाबरण्याची गरज आहे? याचा कोणता नकारात्मक परिणाम होईल का? असे काही प्रश्न बऱ्याच जणांना पडले असतली. चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे.

ADVERTISEMENT

Solar Eclipse 2026
Solar Eclipse 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' ठिकाणी दिसणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण

point

दैनंदिन जीवनावर काय होणार परिणाम?

Solar Eclipse 2026 : लवकरच वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. ग्रहणाच्या वेळी सूर्यदेव कुंभ राशीत विराजमान असतील, म्हणून ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने ही स्थिती विशेष मानली जात आहे. ही घटना विज्ञानासाठी जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीनेही खास मानली जाते. या ग्रहणाबद्दल अनेकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होत आहेत.  हे ग्रहण प्रभावशाली असेल का? यामुळे घाबरण्याची गरज आहे? याचा कोणता नकारात्मक परिणाम होईल का? असे काही प्रश्न बऱ्याच जणांना पडले असतली. चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे.

हे ही वाचा : महाशिवरात्रीला 300 वर्षानंतर येणार 12 दुर्मिळ योग अन् 4 राजयोग, 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठे उलटफेर

ग्रहणाची वेळ काय?

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी सुमारे 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी जवळपास 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत चालेल. म्हणजेच याची एकूण अवधी सुमारे 4 तास 30 मिनिटांपेक्षा जास्त राहील. वेगवेगळ्या देशांमध्ये याची स्थिती वेगवेगळ्या रुपात दिसू शकते.

'या' ठिकाणी दिसणार ग्रहण

हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण अंटार्क्टिकाच्या आसपासच्या क्षेत्रांत दिसून येईल. याशिवाय, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत आंशिक रूपात हे पाहिले जाऊ शकेल. भारतात हे दिसणार नसल्यामुळे येथे कोणताही प्रभाव पडणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार, सूतक तिथेच मानले जाते जिथे ग्रहण दिसते.

हे वाचलं का?

    follow whatsapp