महाशिवरात्रीला 300 वर्षानंतर येणार 12 दुर्मिळ योग अन् 4 राजयोग, 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठे उलटफेर
Mahashivratri 2026 : यंदाची महाशिवरात्र ही एकदम खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीला मोठी खगोलीय घटना घडणार आहे. या पवित्र दिवशी ग्रहांची अशी एक दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे जी गेल्या 300 वर्षांत पाहिली गेली नाही. या दिवशी एकाच वेळी 4 मोठे राजयोग आणि 12 शुभ योगांचा अद्भुत मिलाफ होत आहे. याचा मोठा लाभ काही राशींनी होणार आहे. कोणत्या राशींना हा लाभ मिळणार आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाशिवरात्रीला 300 वर्षानंतर येणार 12 दुर्मिळ योग अन् 4 राजयोग
'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठे उलटफेर
Mahashivratri 2026 : भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता तो दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव हे प्रथमच निराकार रुपात प्रकट झाले होते. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. यावर्षी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र साजरी होणार आहे. मात्र यंदाची महाशिवरात्र ही एकदम खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीला मोठी खगोलीय घटना घडणार आहे. या पवित्र दिवशी ग्रहांची अशी एक दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे जी गेल्या 300 वर्षांत पाहिली गेली नाही. या दिवशी एकाच वेळी 4 मोठे राजयोग आणि 12 शुभ योगांचा अद्भुत मिलाफ होत आहे. याचा मोठा लाभ काही राशींनी होणार आहे. कोणत्या राशींना हा लाभ मिळणार आहे, जाणून घेऊया.
हे ही वाचा : केरळची सर्वात लहान organ donor; 10 महिन्यांची चिमुकली 5 जणांचा जीव वाचवणार!
12 योग एकाच वेळी सक्रिय राहणार
कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध, शुक्र आणि राहूच्या उपस्थितीमुळे चतुर्ग्रही योग तयार होईल, जो ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेला अनेक पटींनी वाढवेल. याचा सर्वात शुभ प्रभाव मेष, सिंह आणि मकर राशीच्या जातकांवर पडेल. या महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे तयार होणाऱ्या योगांची लांबलचक यादी आहे. या दिवशी प्रीति, आयुष्मान, सौभाग्य, साध्य, शिव, शुक्ल, शोभन, सर्वार्थसिद्धि, चंद्रमंगल, त्रिग्रही, राज आणि ध्रुव असे 12 शुभ योग एकाच वेळी सक्रिय राहतील.
'या' राशींना मिळणार लाभ
मेष राशी : ग्रहांच्या या महासंयोगाचा सर्वात पहिला आणि मोठा परिणाम मेष राशीच्या जातकांच्या जीवनात दिसून येईल. या जातकांसाठी करिअरच्या आघाडीवर एक नवीन आणि उत्कृष्ट काळ सुरू होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा एखाद्या मोठ्या जबाबदारीची भेट मिळू शकते. जे लोक स्वतःचा व्यवसाय किंवा व्यापार करत आहेत, त्यांना या काळात धनलाभाच्या अशा संधी मिळतील. यामुळे या जातकांची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत आणि स्थिर करतील.










