पंढरपूर : 'साहेब, आमच्या गल्लीत 2 खून झालेत', असं म्हणत पोलिसांना फोन करणाराच निघाला खुनी! 7 महिन्यांनी उलगडा
Pandharpur Crime News : आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक युक्त्या लढवल्या. खुनाची खबर देणारा आरोपी स्वतःहून पोलिसांना तपासात मदत करण्याचे नाटक करत होता. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूर येथून एकाला, तर दोघांना पंढरपूरमधून ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंढरपूर : 'साहेब, आमच्या गल्लीत 2 खून झालेत',
असं म्हणत पोलिसांना फोन करणाराच निघाला खुनी! 7 महिन्यांनी उलगडा
Pandharpur Crime News : एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल अशा पंढरपूरमधील कुंभार गल्ली येथील माय-लेकाच्या दुहेरी खून प्रकरणाचा अखेर 7 महिन्यांनी उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे, ज्याने पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि तपासाचे सल्ले दिले, तोच यातील मुख्य सूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना शिताफीने अटक केली आहे.
पंढरपुरात काय काय घडलं?
15 जुलै 2025 रोजी कुंभार गल्लीतील सुरेखा संजय जगताप (45) आणि त्यांचा मुलगा लखन संजय जगताप (24) यांचा राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. घटनेच्या वेळी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार नसल्याने पोलिसांसमोर या तपासाचे मोठे आव्हान होते.
तपास भरकटवण्याचा प्रयत्न
आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक युक्त्या लढवल्या. खुनाची खबर देणारा आरोपी स्वतःहून पोलिसांना तपासात मदत करण्याचे नाटक करत होता. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूर येथून एकाला, तर दोघांना पंढरपूरमधून ताब्यात घेतले.










