सोलापूर हादरलं! कपड्याला लहान बाळाची लागली शी, अकबरने प्रेयसीच्याच चिमुकल्याची गळा दाबून केली हत्या

मुंबई तक

Solapur Crime : सोलापुरात एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या आईच्या बॉयफ्रेंडने चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली आहे.

ADVERTISEMENT

solapur crime
solapur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाळाची शी मौलालीच्या कपड्याला लागली अन् चिमुकल्याचा गळा दाबला 

point

बॉयफ्रेंडविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

Solapur Crime : सोलापुरात एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या आईच्या बॉयफ्रेंडने चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील मृत चिमुकल्याचे नाव जाफर शेख (वय 3) असे आहे. तर आरोपी बॉयफ्रेंडचं नाव मौलाली उर्फ अकबर उर्फ रज्जाक मुल्ला असे असून, त्याला सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा : सोलापुरातील बार्शीत रॅगिंगचा भयानक प्रकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत फरहानची आई शाहनाज आणि आरोपी मौलाली यांचे विवाहबाह्य संबंध होते. एकमेकांना भेटण्याच्या बहाण्याने मौलाली हा आणि शहनाज हे दोघेही सोलापुरात वास्तव्यासाठी आले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

बाळाची शी मौलालीच्या कपड्याला लागली अन् चिमुकल्याचा गळा दाबला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर रोजी रात्री तीन वर्षांचा चिमुरडा फरहान झोपलेला असताना त्या लहान बाळाची शी मौलालीच्या कपड्याला लागली होती. त्या मौलानीने चिमुकल्याला मारहाण केली आणि त्याचा गळा दाबला. शहनाज हे बेशुद्ध अवस्थेत फरहानला येऊन विजयपूर येथे गेले होते. मात्र, विजयपूरातील एसटी स्टँडवर पोहोचताच मौलालीने घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पत्नी शहनाजने आपल्या पतीलासोबत घेऊन आपल्या फरहानला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र. डॉक्टरांनी फरहानचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

बॉयफ्रेंडविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

नंतर शवविच्छेदन करण्यात आले आणि त्या अहवालातून फरहानचा गळा दाबण्यात आला असल्याची माहिती दिली. या प्रकरणी आता शहनाजचा बॉयफ्रेंड मौलालीविरोधात विजयपूर पोलीस ठाण्याच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, नंतर ही घटना सोलापुरातील असल्याने सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे हे प्रकरण सोपवण्यात आले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp