सोलापुरातील बार्शीत रॅगिंगचा भयानक प्रकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण
solapur crime : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत एक रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महाविद्यालयातील इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला रॅगिंगच्या जाळ्यात अडकवून त्याला तब्बल तीन तास बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विद्यार्थ्याला स्टम्पने तीन तास मारहाण
मारहाणीचं कारण समोर
Solapur Crime : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत एक रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महाविद्यालयातील इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला रॅगिंगच्या जाळ्यात अडकवून त्याला तब्बल तीन तास बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. यामुळे आता महाविद्यालयाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील पीडित तरुणाचे नाव प्रसिक बनसोडे असे आहे. त्याच्यावर धाराशिव रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांच्या प्रेमात उत्साह निर्माण होण्याची शक्यता, जाणून घ्या एकूण राशीभविष्य
विद्यार्थ्याला स्टम्पने तीन तास मारहाण
पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडेनं दिलेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांनी खोलीत जबरदस्तीने प्रवेश केला. नंतर क्रिकेट खेळण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्टम्पने मारहाण केली होती. प्रसिक बनसोडे म्हणाला की, 'मला तीन तास मारहाण केली,' असा आरोप पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडेनं केला होता.
मारहाणीचं कारण समोर
संबंधित प्रकरणात प्रसिकला मारहाण करण्याचे कारण आता समोर आले आहे. प्रसिकने रुम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर काम करण्यास नकार दिला होता. याच कारणावरून त्याला बेदम मारहाण केल्याचा पीडित विद्यार्थ्याने आरोप केला होता. त्यानंतर त्याने दावा केला की, महाविद्यालयाचे प्रशासन हे दोषी असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा : मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे! स्थानिकांकडून चांगलाच चोप...
या प्रकरणाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाने आता पालक वृंदामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत चौघांवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित तरुणाला न्याय मिळावी अशी मागणी केली जात आहे.










