Maharashtra Weather : राज्यात हाडं गोठवणारी थंडी, कोकणापासून विदर्भात हवामान कसं असणार?
Maharashtra Weather : राज्यात विविध भागांत पारा पारा मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट जाणवणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात विविध भागांत पारा मोठ्या प्रमाणात खाली गेला
24 तास थंडीची लाट आणखीनच वाढण्याची शक्यता
Maharashtra Weather : राज्यात विविध भागांत पारा मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट जाणवणार आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांनुसार हवामान विभागाने 24 तास थंडीची लाट आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर जाणून घेऊयात 23 डिसेंबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : 'बघतोय काय रागानं?' पुण्यातील हडपसरमध्ये 9 जणांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला, भर थंडीतच रॉडने मारहाण
कोकण विभाग :
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबईत थंडीची लाट पसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईत सध्या तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर कोकणात थंडीची प्रभावी लाट वाढली आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात देखील हवामान विभागाने थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला. तसेच या भागातही काही प्रमाणात तापमानात घट निर्माण झाल्याचा अंदाज आहे. याच विभागात थंडीचा अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात देखील थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी तापमान 10°C पेक्षा खाली नोंदवण्यात आले होते. तसेच हवामान विभागाने या भागात पुढील काही दिवसांत तापमान कमी राहण्याचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने नांदेड, हिंगोली आणि नांदेडसारख्या जिल्ह्यात सामान्य थंडी जाणवत आहे.










