नवरा-बायको एकत्रच गेले बाथरूममध्ये, बंद दाराआड नेमकं घडलं तरी काय की दोघांचाही गेला जीव?

मुंबई तक

accident news : बंद घराच्या खोलीत नवरा-बायकोचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय?

ADVERTISEMENT

accident news
accident news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घराचा दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये चित्रविचित्र...

point

नेमकं काय घडलं? 

accident news : उत्तर प्रदेशातील पीलीभीतमधील गोकुलधाम कॉलनीत सोमवारी भयानक प्रकार उघडकीस आला आहे. एका बंद घरातील बाथरूममध्ये नवरा-बायकोचा मृतदेह आढळून आला होता. गॅस किंवा गीझरमुळे हा मोठा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मृत पतीचं नाव हरजिंदर सिंग आणि पत्नीचं नाव रेणू सक्सेना असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेलं आहे. 

हे ही वाचा : 'बघतोय काय रागानं?' पुण्यातील हडपसरमध्ये 9 जणांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला, भर थंडीतच रॉडने मारहाण

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, पत्नी रेणूचा हात फ्रॅक्चर झाला होता. सोमवारी, जेव्हा ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिचा पती हरजिंदर तिला मदत करण्यासाठी आत गेला होता. हरजिंदर नोकरीला जाण्याच्या तयारीतच होता. पण, गिझरमधून निघणाऱ्या वायूने दोघेही गुदमरल्याची अनेकांनी भीती व्यक्त केली. शेजाऱ्यांना या प्रकरणाबाबत वेगळाच संशय आल्याचं सांगण्यात येत आहे.

घराचा दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये चित्रविचित्र...

रात्रीच्या वेळी छतावर कपडे दिसून आले होते, तेव्हा शेजाऱ्यांना ही घटना समजली. संशय आल्याने त्यांनी घरी फोनद्वारे संपर्क केला होता, पण कोणीही प्रतिसाद देत नाही हे पाहून त्यांनी रेणू आणि हरजिंदरच्या घरी धाव घेतली होती. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी दरवाजा तोडला आणि आतमधील चित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली.

हे ही वाचा : 'तिचा नाद सोडा...' सरपंच पत्नीच्या नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी प्रेमसंबंध, कंटाळलेल्या बायकोनं उचललं टोकाचं पाऊल

या प्रकरणाचा फॉरेन्सिक पथक आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रम दहिया यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गॅसच्या गळतीने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु ठेवला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp