सोलापूर महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या होत्या? कशी होती काँग्रेसची कामगिरी?

मुंबई तक

Solapur Mahapalika Election 2026 : राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार सोलापूर महानगरपालिकेची प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 102 नगरसेवक निवडले जाणार असून, महापालिका क्षेत्र 26 प्रभागांमध्ये विभागण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

Solapur Mahapalika Election 2026
Solapur Mahapalika Election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या होत्या?

point

2017 च्या निवडणुकीत कशी होती काँग्रेसची कामगिरी?

सोलापूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. दीर्घकाळ प्रशासक राजवटीखाली असलेल्या महापालिकेत पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार येणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

दीडशे वर्षांचा गौरवशाली इतिहास

सोलापूर महानगरपालिका ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील सर्वात जुन्या नागरी संस्थांपैकी एक मानली जाते. 1860 साली नगरपालिकेच्या स्वरूपात स्थापन झालेल्या या संस्थेला 1963 मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. प्राचीन इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि औद्योगिक विकास यामुळे सोलापूरचं वेगळं स्थान आहे.

प्रभागरचना: 102 नगरसेवक, 26 प्रभाग

राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार सोलापूर महानगरपालिकेची प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 102 नगरसेवक निवडले जाणार असून, महापालिका क्षेत्र 26 प्रभागांमध्ये विभागण्यात आलं आहे.

चार सदस्यीय प्रभाग: 24

हे वाचलं का?

    follow whatsapp