कृष्णराज महाडिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कोणत्या प्रभागाची होतेय चर्चा?
Kolhapur Mahapalika Election : कृष्णराज महाडिक यांचा यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस होता. मात्र, त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते पुढील राजकीय वाटचालीची तयारी करत असल्याची चर्चा होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कृष्णराज महाडिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
कोणत्या प्रभागाची होतेय चर्चा?
Kolhapur Mahapalika Election : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबातून आता नव्या पिढीचा राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता चर्चेत आहे. महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी दाखल करू शकतात. तसे झाल्यास महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी थेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रिय होणार आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी हालचाली पाहता त्यांना उमेदवारी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
कृष्णराज महाडिक यांचा यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस होता. मात्र, त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते पुढील राजकीय वाटचालीची तयारी करत असल्याची चर्चा होती. अशातच महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याची शक्यता समोर आल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहितीही पुढे आली आहे. मात्र, तो अर्ज प्रत्यक्षात दाखल केला जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
हेही वाचा : प्रेयसीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरला अन् 'त्या' ठिकाणी फेकला... हत्येमागचं नेमकं कारण काय?










