पुण्यातील शाळकरी मुलीचा धक्कादायक प्रताप, शिक्षिकेलाच 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस अन् हातावर नाव कोरून आत्महत्येची धमकी...

मुंबई तक

अल्पवयीन मुलीने आपल्याच शाळेतील शिक्षिकेच्या प्रेमात पडल्याचं सांगून त्यांच्या सतत अश्लील मॅसेज केले, इतकेच नव्हे तर तिने शिक्षिकेवरच्या प्रेमाखातर आत्महत्या करण्याची धमकी देऊ स्वत:ला इजा करून घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

शिक्षिकेलाच 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस अन्...
शिक्षिकेलाच 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील शाळकरी मुलीचा धक्कादायक प्रताप

point

शिक्षिकेलाच 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस अन्...

point

हातावर नाव कोरून आत्महत्येची धमकी...

Pune Crime: पुणे शहरात एका नामवंत शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीने आपल्याच शाळेतील शिक्षिकेच्या प्रेमात पडल्याचं सांगून त्यांच्या सतत अश्लील मॅसेज केले, इतकेच नव्हे तर तिने शिक्षिकेवरच्या प्रेमाखातर आत्महत्या करण्याची धमकी देऊ स्वत:ला इजा करून घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे. परंतु, शाळेच्या प्रशासनाने दामिनी पथकाच्या मदतीने पीडितेचं समुपदेशन केल्याची माहिती समोर आली आहे. 

ब्लेडने शिक्षिकेचं नाव कोरलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने शिक्षिकेवर प्रेम असल्याचा दावा करत ती त्यांच्या मोबाईलवर सतत अश्लील मॅसेजेस पाठवायची. हृदयाच्या इमोजींसह 'आय लव्ह यू', 'तुम्ही दुसऱ्यांशी बोललेले मला पटत नाही', 'तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही' असे मॅसेजेस ती पीडित शिक्षिकेला पाठवायची. इतकेच नव्हे तर, संबंधित विद्यार्थीनीने तिच्या हातावर ब्लेडने शिक्षिकेचं नाव कोरल्याचं आणि तिला शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचं समोर आलं. 

हे ही वाचा: नाशकात राडा, ठाकरेंच्या युतीनंतर पेढे वाटणारे विनायक पांडे भाजपात जाणार, पण फरांदेंनी वाट अडवली अन्

शिक्षिकेला 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस

संबंधित विद्यार्थीनीने केवळ शिक्षिकेसोबतच नव्हे तर तिच्या वर्गातील मुलींसोबतही अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी, मुलीने तिच्याच वर्गातील एका मैत्रिणीला वॉशरूममध्ये गाठलं आणि 'तू खूप सुंदर दिसतेस', 'तुला बॉयफ्रेंड आहे का?' अशी अश्लील पद्धतीने विचारणा केली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर, 9 वीत शिकणाऱ्या चार ते पाच मुलींनाही तिने 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस पाठवून त्यांच्या हातात अंगठी घालण्याचा प्रयत्न केला होता. 

हे ही वाचा: Govt Job: रेल्वेमध्ये तब्बल 22,000 रिक्त जागांसाठी भरती! 10 पास उमेदवारांनी करा अप्लाय...

मुलीच्या वागण्यातील गांभीर्य लक्षात घेता, शाळा प्रशासनाने दामिनी मार्शल पथकाची मदत घेतली आणि समुपदेशनाच्या माध्यमातून तिला समजावण्यात आलं.  वयात येताना होणारे हार्मोन्समधील बदल आणि भावनिक गोंधळ यातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp