Maharashtra Weather : राज्यात 'या' विभागात थंडीची लाट, तर काही शहरांवर पसरणार धुक्याची चादर
maharashtra weather : महाराष्ट्रात थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुसार राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (IMD) नुसार तापमानात घट होण्याची शक्यता
Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुसार राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यापैकी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी अधिक तीव्र असेल, तर कोकणात तुलनेने थंडी मध्यम असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
विभागातील शहरांतील हवामान अंदाज:
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबईचा समावेश होतो. यापैकी मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, सकाळी धुके असण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र या विभागातील पुणे शहरात कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस, तर किमान 9 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी धुके आणि थंडीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते.










