दिव्यात 5 वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्याचा प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत
Diva Dog Attack Child Death : दिवा शहरात एक मन हेलावणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 5 वर्षीय मुलीवर कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला. रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिवा शहरात एक मन हेलावणारा धक्कादायक प्रकार
पिसाळलेल्या कुत्र्याने मुलीवर चढवला हल्ला
मुलीला चौथं इंजेक्शन पण...
Diva Dog Attack Child Death : दिवा शहरात एक मन हेलावणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 5 वर्षीय मुलीवर कुत्र्याने हल्ला करत जोराचा चावा घेतला. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत मुलीचं नाव निशा शिंदे असे असून या घटनेनं महापालिका प्राशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : पित्याने मुलाला दुध आणायला पाठवले, पिसाळलेल्या बापानं अल्पवयीन लेकीचा गळा चिरला, हादरवणारं प्रकरण
पिसाळलेल्या कुत्र्याने मुलीवर चढवला हल्ला
घडलेल्या घटनेनुसार, मुलगी ही 17 डिसेंबर रोजी राहत्या घरात खेळत होती. तेव्हा एका भटक्या कुत्र्याने निशावर हल्ला चढवला आणि जोराचा चावा घेतला. नंतर तिला तातडीने डोंबिवलीतील एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीवर अनेक दिवसांपासून उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली. नंतर मुलीवर उपचारादरम्यान, इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
मुलीला चौथं इंजेक्शन पण...
दरम्यान, तिचा 3 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हा तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, 16 डिसेंबर रोजी मुलीला चौथं इंजेक्शन देण्यात आलं होतं. याचदरम्यान, पीडितेला रेबिझची लक्षणे दिसून येऊ लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.
हे ही वाचा : पुणे जिल्ह्यातील इंदापुरात पत्नी पहाटे अंघोळीला चालली होती, इतक्यात मागून तिच्यावर... भयंकर कांड
मुलीच्या प्रकृतीचं गांभीर्य ओळखून तिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर तिथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत अगदी चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि अशातच उपचारा सुरु असतानाच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याच प्रकरणात अॅड. रोहिदास मुंडे यांनी औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण आणि संदर्भ प्रक्रियेचा तपास होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.










