पुणे जिल्ह्यातील इंदापुरात पत्नी पहाटे अंघोळीला चालली होती, इतक्यात मागून तिच्यावर... भयंकर कांड
pune crime : पुणे जिल्ह्यतील इंदापूर तालुक्याच्या शेळगावात गावठाण परिसरात एक धक्कादायक घटना घडली. महिला अंघोळीला जाताना एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याचा मन हेलावणारा प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे जिल्ह्यतील इंदापूर तालुक्यात धक्कादायक घटना
पत्नी अंघोळीसाठी गेली अन्...
Pune Crime : पुणे जिल्ह्यतील इंदापूर तालुक्याच्या शेळगावात गावठाण परिसरात एक धक्कादायक घटना घडली. महिला अंघोळीला जाताना एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याचा मन हेलावणारा प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेचं नाव समोर आले आहे. मनीषा मल्हारी खोमणे (वय 23) असं आहे. संशयित आरोपी हा दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा पती आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : मध्यरात्री हॉटेलमध्ये सुरु होता चार जोडप्यांचा घाणेरडा खेळ, पोलिसांनी रेड टाकताच नको त्याच अवस्थेत आढळले
पत्नी अंघोळीसाठी गेली अन्...
प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास मनीषा खोमणे या अंघोळीसाठी जात होत्या. तेव्हा पतीने पाठीमागून डोक्यात जोरदार हल्ला केला होता. या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळल्या. परिस्थिती बघून त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. संशयित आरोपी असलेल्या मल्हारी खोमणे याच्यावर यापूर्वीही वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर संशयित आरोपीने हा घटनास्थळावरून पळून गेला. वालचंदनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा : पित्याने मुलाला दुध आणायला पाठवले, पिसाळलेल्या बापानं अल्पवयीन लेकीचा गळा चिरला, हादरवणारं प्रकरण
आरोपीने आपल्या पत्नीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधत आहेत. पत्नीला त्याने इतक्या क्रूर पद्धतीने मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहेत. या घटनेनं शेळगार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनं कुटुंबातील लोकांवर काळाचा घाला घालण्यात आला आहे.










