मुंबईची खबर: आता, ठाण्याच्या अंतर्गत भागांत धावणार मेट्रो! थेट रेल्वे स्थानकाशी कनेक्शन अन्...
आता, ठाण्यात वेगळं मेट्रो नेटवर्क निर्माण करण्यात येणार असून या नेटवर्कमध्ये शहरातील अंतर्गत भाग जोडले जाणार आहेत. जवळपास 29 किमी लांब असलेल्या या मेट्रोच्या मार्गिकेमुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता ठाण्याच्या अंतर्गत भागांत धावणार मेट्रो!
थेट रेल्वे स्थानकाशी मेट्रोचं कनेक्शन अन्...
Mumbai News: ठाणे शहरात लवकरच रिंग मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत मेट्रो नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढल्याने कित्येक परिसरांतील वाहतूक ही सुलभ झाल्याचं पाहायला मिळतंय. आता, ठाण्यात वेगळं मेट्रो नेटवर्क निर्माण करण्यात येणार असून या नेटवर्कमध्ये शहरातील अंतर्गत भाग जोडले जाणार आहेत. जवळपास 29 किमी लांब असलेल्या या मेट्रोच्या मार्गिकेमुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
सर्क्युवर मेट्रो लाईनची निर्मिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यातील रिंग मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट कॉरिडॉरसाठी मान्यता दिली होती. ठाण्यातील शहरी म्हणजेच अर्बन वाहतूक सुधारण्यासाठी तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने ही सर्क्युलर मेट्रो लाईन बांधली जात आहे. मेट्रोचा हा मार्ग वागळे इस्टेट, मानपाडा, वाघबिल, बाळकुम, कोलशेत, साकेत, डोंगरीपाडा, नौपाडा आणि हिरानंदानी इस्टेट सारख्या मुख्य निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांना जोडेल.
हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी! BSF कडून 'या' पदांसाठी भरती जाहीर...
महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध
मेट्रोच्या या मार्गात एकूण 22 स्थानके असतील आणि यामध्ये 20 उन्नत स्थानके आणि दोन भूमिगत स्थानके असतील. जुन्या आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानकांवर भूमिगत मेट्रो स्थानके बांधली जातील. यासोबतच, डॉ. काशीनाथ घाणेकर थिएटर, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिल आणि वॉटरफ्रंट येथे एलिव्हेटेड मेट्रो स्थानके असतील. या मेट्रो प्रोजेक्टमुळे ठाण्यातील प्रवास जलद होईल. याव्यतिरिक्त, रिंग मेट्रो मुंबई मेट्रो मार्ग 4 आणि मार्ग 5 शी कनेक्ट होईल. यामुळे मुंबई, ठाणे आणि कल्याण सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.
हे ही वाचा: मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ पोलिसाचे गतीमंद महिलेशी अश्लील चाळे! स्थानिकांकडून चांगलाच चोप...
तसेच, ही मेट्रो मुंबई मेट्रो लाईन 4 ला रैला देवी आणि डोंगरीपाडा येथे आणि बाळकुम नाक्याजवळ लाईन 5 ला कनेक्ट होईल. ठाणे जंक्शनला देखील थेट मेट्रो कनेक्शन मिळेल. दरम्यान, या प्रोजेक्टची निविदा प्रक्रिया डिसेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि कामाचा पहिला टप्पा 2026 ते 2028 काळात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण रिंग मेट्रो 2029 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.










