रत्नागिरीत देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, महिला खाली कोसळली अन् तोंडावरून गेलं गाडीचं चाक
Ratnagiri accident : रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात रायपाटण येथे 24 डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी 10 वाजता एक भीषण अपघात झाला होता. याच भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवदर्शनासाठी गेलेल्या कारचा भीषण अपघात
महिलेच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेले
Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात रायपाटण येथे 24 डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी 10 वाजता एक भीषण अपघात झाला होता. याच भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचं नाव पार्वती सेनू (वय 75) असे आहे. या अपघातात महिलेच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेले होते, याच अपघातात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
हे ही वाचा : 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
देवदर्शनासाठी गेलेल्या कारचा भीषण अपघात
घडलेल्या घटनेनुसार, पुण्याच्या पिंपळे सौदागर येथील रहिवासी असलेले तेजस शेलार हे आपल्या क्रेटा (MH 14, ML 1618) चार चाकी गा़डीने देवपदर्शनासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या गाडीत लहान मुलं आणि इतर कुटुंबातील सदस्य देखील होते. कुटुंबीय पुण्याहून कुणकेश्वर या देवस्थानाकडे जात असताना हा भीषण अपघात झाला.
पार्वती सेनू खाली कोसळल्या आणि डोक्यावरून गाडीचे चाक गेले
दरम्यान, रायपाटण टक्केवाडी येथे त्यांची गाडी आली असता, पाचल गुरुववाडी येथे एका दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीने कारला मागून धडक दिली होती. याअनपेक्षित झालेल्या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेल्या एका पार्वती सेनू यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. त्याचक्षणी एक मालवाहून येणारा ट्रक (MH 08 AQ 66) तेथून जात होता. तेव्हा रस्त्यावर आलेला ट्रक पार्वती सेनू यांच्या तोंडावरून गेला. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : पतीचे ब्युटी पार्लर महिलेशी प्रेमसंबंधाचा संशय, बायकोनं तिच्यावर अॅसिडने हल्ला करण्यास दिली सुपारी, नंतर...
ट्राक चालकाचे नाव संतोष सिद्धार्थ सावंत असे आहे. संबंधित अपघाताची माहिती राजापूर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.










